मुंबईत वंचितांचे वादळ ……..!
लाखो लोकांच्या गर्दीत काल सायन च्या सोमया मैदानात तुफान गर्दीत घोंगावले.
सभेतील वैशिष्ट्य
डिजिटल पक्षाचा जाहीरनामा
वंचित बहुजन आघाडी च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकरिता काल मुंबईतील वंचित च्या उमेदवार प्रचाराची भव्य सभा सायन येथील सोमाया मैदानावर पार पाडली. या सभेला मुंबई आणि उपनगरात जे उमेदवार उभे आहेत त्यांचा परिचय करून देण्यात आला व त्यांना पक्षाचे चिन्हांकित शाल ही प्रदान करण्यात आली. या प्रसंगी मुंबईतील उमेदवारांनी आपले विचार ही मांडले .
नेहमी प्रमाणे शाहीर शीतल साठे यांच्या नवयान महाजलसा यांनी क्रांतिकारी गीते सादर करण्यात आली त्यात प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे,मधुर शिंदे,शाहीर शीतल साठे यांची उत्साह पुर्वक गीते सादर झालीं त्यानंतर वंचित चे महासचिव डॉ अरुण सावंत यांनी उपस्थित समूहाला आपली आणि मुंबईत उमेदवार यांनी ओळख करून देत औपचारिक सभेला सुरुवात केली.
पुढे विविध वक्त्यांची आणि उमेदवार यांची भाषणे झाली.
सभेला अफाट गर्दी अनुयायांनी केली पुष्पवृष्टी
लाखोंच्या संख्येने आलेल्या लोकाना वंचित चे सर्वे सर्वा आद बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आगमनाची प्रतीक्षा होती .महाराष्ट्राच्या झंझावाती प्रचार दौऱ्यावर असलेले ऍड आंबेडकर आज तीन मोठ्या सभा घेऊन मनमाड ,नाशिक करत अखेर मुंबईत दाखल झाले .नाशिक आणि मनमाड मधील तुफान गर्दीत सपन्न झालेले सभांना असलेला लोकांनाच प्रतिसाद हा शब्दांत व्यक्त करण्यापलीकडे आहे .लोकांची गर्दी पाहून या वेळी परिवर्तन अटळ आहे हे जाणवत आहे .
संध्याकाळी मुंबईत ज्या प्रकारे ऍड प्रकाश आंबेडकर दाखल झाले गर्दीत एव्हडी तुफान होती की तिला रोखता येत नव्हते .प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोक मुंबईतील सर्व भागातून जमा झाले होते .
काल च्या सभेतील ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मंडलेल्या मुद्दे हे खूपच परिणाम कारक असून भयाण वास्तव आहे .
प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
सभा स्थळी दाखल जाताच वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जनतेला अर्पण करण्यात आला.वंचित ने प्रकाशित केलेला जाहीरनामा हा पाहिच डिजिटल फॉरमॅट मध्ये असून तो जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी एक नंबर ही देण्यात आला आहे .राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा डिजिटली स्वरूपात प्रकाशित करणे हे प्रथमतः घडले असून खरे वंचित बहुजन आघाडी हा पहिलाच पक्ष आहे की ज्या पक्षाचा जाहीरनामा जनतेसाठी खुला आहे.
काही खास मुद्ददे
@वंचित च्या लोकसभेतील जाहिरनामा इतर पक्षातने कोपी पेष्ट केलाय.
@वंचित च्या मागच्या जाहीर नाम्यातील मुध्ये उदाहरण म्हणजे KG ते PG शिक्षण मोफत हा मुद्दा आमचा होता तो राष्ट्रवादी ने आपल्या जाहीरनाम्यात घेतला -जेव्हा त्यांचं सरकार असताना हे त्यानि का केले नाही सरकार त्यांचे होते .राष्ट्रवादीत साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट यांची लॉबी असताना हे असताना आता हा मुद्दा त्यांनी घेतला आहे .
@आमचा पाण्याचे समान वाटप म्हणजे दुष्काळी भागात नद्या जोडप्रकल्प नसून ज्या ठिकानचे पाणी वाया जात आहेत ते पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी काय करता येईल हा आहे तो ही मुद्दा इतरांनी ही कॉपी केलाय.
जसे इंटरनेटवर कॉपी पेष्ठ करून लिहिले जाते तसे आता जाहीरनामा ही कोपी पेस्ट केला जातो हे सिद्ध झालेय.
@शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे .ती आता पर्यंत कुणीच केली नाही आम्ही त्यावर खास बजेट करू.
@तंत्रज्ञान विकसित झाले आहे त्याचा योग्य आणि पर्यावरण पूरक वापर करुन मुंबईतील कचऱ्यातून वीज निर्मिती करता येईल का हे पाहावे लागेल .
@शहरे म्हटले की झोडपटी आली मुबईतील झोपडपट्टी राहणाऱ्या लोकाना सन्मानपूर्वक त्यांचे हक्काचे घर मिळाले पाहिजे सध्या SRA हा मुबाईतील बिल्डर यांचा साठीं असून बिल्डर सर्वसामान्य माणसाला फसवणूक करीत आहेत.
@स्वातंत्रपुर्व काळात ब्रिटिशांनी मुंबई करांना लुटले आता स्वकीय लोक लुटतात .
@ब्रिटिश यांनी बांधलेल्या BDD चाळी ही खुराडी आहेत अशीच आता SRA च्या नावाखाली स्वकीय सरकार करत आहे.जागेचे मापन करून त्याचेसमान वाटप करण्यात येईल.
@सध्या मुंबईतील मूळ मालक आगरी कोळी,भंडारी ,ईस्ट इंडियन यांकडे त्यांच्या प्रॉपर्टी चे प्रॉपर्टी कार्ड नाहीय जसे ग्रामीण भागात सातबारा असतो तसा मुंबईतील जमीन मालकांना आम्ही तो हक्क मिळवून देऊ.
@मुबई ही सोन्याची खान आहे तिला ब्रिटिशांनी लुटले ,स्वकीयांनी लुटले हे आता थांबले पाहिजे मुळजमीन मालकांच्या नावावर जमीन करून देण्याचे आश्वासन देत आहे.
@मुंबईतील वाहतूक कोंडी ही भयानक असून मु।बाईतील प्रवास मी गेली 32 वर्ष करत असून ट्रेन ला कमीत कमी तास दोन तास लागतात तर रॉड मार्गे कमीत कमी तीन तास लागतात हे कमी करावयाचे असेल तर समुद्र मार्गाने वाहतूक करण्याचा प्रकल्प सुरू करावा आहे वाटत असून आम्ही ते करु.
@मुंबईत विजेचा दर वेगळा आणि उपनगरात वेगळा आहे उपनगरात असलेला विजेचा दर हा मुंबईतील विजेच्या दरपेक्षा जास्त आहे आम्ही आलो तर सर्व प्राव्हेट वीज कंपन्या बेस्ट मध्ये विलीन करू आणि समान वीज पूर्णपणे देऊ.
@आम्ही सुरुवातीला म्हटले होते की हे सरकार आले तर बँका डबघाईला येतील आणि तुमचा पैसे असुरक्षित राहील आज बँकांचे घोटाळे बघा आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे आता अर्थतज्ज्ञ ही तेच सांगत आहेत अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती हे हेच सांगत आहेत.
@रोजगार निर्मिती चे काय झाले ,विविध कंपन्याशी केलेल्या कराराचे काय झाले ?
@मुंबईतील आगरी ,कोळी,भांडारी आणि ईस्ट इंडियन लोकांना केले आव्हान तुम्ही निवडून द्या तुमच्या जमिनी तुमच्या नावावर करू.
@हे सतेचा घोडा लगाम न लागता धावत आहे त्याला आता रोखायला पाहिजे असे ही ते म्हणाले …..!
@हे सरकार सामन्य माणसांचे सरकार नसून केवळ इंडिस्ट्रीयलिस्ट अर्थात कारखानदार लोकांचे हित जपणारे आहे असे ही ते म्हणाले .
शेवटी विविध मुद्यांचे प्रभावी विश्लेषण करत एक खिल्ली उडवताना म्हणाले की काही दिवसांपूर्वी म स न व टा मला म्हणाला की राजनाथ सिंग प्रचाराला येणार आहेत का ? त्यांना विमानात लिंबु कसे लाववयचे हे शिकवणार आहे ? त्याने ने माझा ही अभ्यास घेतला आणि लिंबू कसे धारेधार असावे लागते हे सांगितले.
लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जंगी सभेचे live प्रक्षेपण कोणत्याच न्यूज चॅनल वर नव्हते हे नमूद करावे लागते शेवटी काही कार्यकर्ते मेडीआयवर ही भडकेले दिसले .
वंचित ला मिळणारं पाठिंबा ही जमेची बाजू असून गर्दीचे मतात रूपांतर होण्याची गरज आहे.
टीम : www.ambedkaree.com