विक्रोळी विधानसभा -१५६
विक्रोळी_विधानसभा या निवडणुक क्षेत्रात इथल्या मतदारांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसुन येतोय.
आणि त्याच एकमेव कारण म्हणजे सिद्धार्थ दादा मोकळे…
सिद्धार्थदादा मोकळे
त्यांना त्यांच्या हक्काची बुलंद आवाजाची मुलखमैदानी तोफ सापडल्याचा एक वेगळाच आनंदच त्यांच्या चेहर्यावर झळकतोय. विक्रोळीत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ दादा मोकळे व सेनेचे उमेदवार राऊत यांच्याच चुरशीच्या लढतीचीच चर्चा ऐकायला मिळतेय. इतर पक्ष औषधालाही सापडेनात.
आता हि लढाई एका सुशिक्षित तरुण विरुद्ध प्रस्थापित माजी आमदार यांच्यात नसुन तर इथल्या त्रस्त वचिंत नागरिकां विरुद्धात एक मस्तवाल सेनेचा उमेदवार अशी थेट लढत होत आहे.इथल्या लोकांना आता बदल हवाय.आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झालाय कि आपण मस्तवाल नेत्याला पाडू शकतो.आणि आपल वचिंत बहुजन समाज विधानसभेत प्रतिनिधित्व करु शकतो.आणि हाच विश्वास आपल्याला विजया पर्यंत पोहचवतोय….
विक्रोळीत बदल_हवा ……..!