वंचित बहुजन आघाडीने आपल्या प्रचाराच्या झंझावाताने पूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात , प्रत्येक मतदारसंघात होत असलेल्या विबीएच्या सभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. त्यातही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे, विबीएला मिळत असलेले हे जनसमर्थन महाराष्ट्रातील वंचित बहुजन समाजाला सत्तेत पोहचविणार आहे याची खात्री वाटत आहे.
अनेक दशकांच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता राज्यातील धनगर, माळि, तेली, कोळी, बंजारा, बौद्ध, मातंग, वडार, मुस्लिम, ढीवर अश्या वंचित ठेवण्यात आलेल्या जातीसमूहांच्या हाती येईल अशी परीस्थिती ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार झालेली आहे. ही वंचित बहुजन समाजासाठी संधी आहे सत्तेतील आपले स्थान मिळवायची. ही संधी आता वाया जाऊ न देण्याची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे वंचित बहुजन आघाडीसाठी झटत असलेल्या प्रत्येक नेत्या, कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या मेहनतीतून दिसून पडते आहे.
#VBA
काळ बीड येथे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे फोटो सोबत आहेत.