महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी.

महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी.

भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना जागतिक दर्जाचे वकील, राजकीय नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या महार कुटुंबात जन्मल्यामुळे त्याना आपले सर्व आयुष्य नरक यातनांमध्ये व्यतीत करावे लागत होते पण त्यांच्या वडिलांनी अपार कष्ट करून शिक्षण दिले .अस्पृश्य लोकांना शिक्षण,चांगले राहणीमान यावर कडक निर्बंध होतेच पण त्यांना साधा सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याची व लोकना स्पर्श करण्याचा ही प्रतिबंध होता .अस्पृश्यता इतकी भयानक होती की अस्पृश्य लोकांच्या सावलीचा आणि जमिनीवरील पायाच्या पावलांचा ही धार्मिक लोकांना विटाळ होत होता.अशा प्रतिकुल परिस्थितीत ही बाबासाहेब डगमगले नाहीत आणि त्यांच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अजूनही लोकांना पूर्णपणे माहीत नाहीत .या लेखाच्या माध्यमातून डॉ .बी.आर.आंबेडकर अर्थात बाबासाहेबांचा अभ्यास करूया.


भारतरत्न डॉ. भीमराव रामाजी आंबेडकर बाबासाहेब, डॉ भीमराव आंबेडकर म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महूच्या एका लष्करी गरीब अस्पृश्य कुटुंबात झाला होता आणि त्यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ , रोजी दिल्लीत त्यांच्या राहत्या घरात झाले.

२५ महामानव भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांविषयी अज्ञात गोष्ठी.

१. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे १४ वे आणि शेवटचे मूल होते.

२. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव अंबावडेकर होते. परंतु त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना शालेय नोंदींमध्ये आंबेडकर आडनाव दिले.

३)डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएचडी) मिळविणारे पहिले भारतीय होते.
४) डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा लंडन संग्रहालयात कार्ल मार्क्सशी संलग्न आहे.

५)भारतीय तिरंगामध्ये “अशोक चक्र” ला स्थान देण्याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही जाते.

६)नोबेल पारितोषिक विजेते प्रा. अमर्त्य सेन डॉ. बी. आर. आंबेडकर यांना अर्थशास्त्रातील वडील मानतात.

७) मध्य प्रदेश आणि बिहारच्या चांगल्या विकासासाठी बाबासाहेबांनी ५०च्या दशकात या राज्यांचे विभाजन प्रस्तावित केले होते, परंतु २००० नंतरच छत्तीसगड आणि झारखंडची स्थापना मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये विभागून झाली.

८)डॉ.बाबासाहेबांच्या वैयक्तिक ग्रंथालय “राजगृह”मुंबई येथे,५०,००० पेक्षा जास्त पुस्तके आणि ग्रंथ आहेत आणि ती जगातील सर्वात मोठी खासगी लायब्ररी होती आणि पुस्तकांसाठी आपले नवे घर उभारणारा जगातला एकमेव महामानव.

९)डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले “वेटिंग फॉर व्हिसा” हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठातील एक पाठ्यपुस्तक आहे. कोलंबिया विद्यापीठाने २००४ मध्ये जगातील पहिल्या १०० अभ्यासकांची यादी केली आणि त्या यादीतील पहिले नाव डॉ भीमराव आंबेडकर होते.

१०) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६४ विषयात मास्टर होते. त्यांना हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती अशा भाषांचे ज्ञान होते.

११) लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टरेट साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यास ८ वर्ष लागतात तो फक्त २ वर्षात ३ महिन्यांत पूर्ण केला. यासाठी त्यांनी दिवसात २१ तास अभ्यास केला.

१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मातील दीक्षा त्यांच्या ८,५०,००० अनुयायांना ऐतिहासिक बौद्ध धम्माची दिक्षा दिली .रक्ताचा एक ही थेंब न सांडता सर्वात मोठी ऐतिहासिक धम्मक्रांती होती कारण हे जगातील सर्वात मोठे धर्मांतर होते.

१३)महास्थविर वीर चंद्रमणी”, ह्या महान बौद्ध भिक्कु होते. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना “या काळातील आधुनिक बुद्ध” म्हटले होते .

१४)लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून “डॉक्टर ऑल सायन्स” नावाची मौल्यवान डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या नंतर जगभरातील बर्‍याच हुशार विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न केले पण ते आतापर्यंत यशस्वी झाले नाहीत.

१५)डॉ बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव महामानव आहेत की त्याच्या जीवनावर जगभरातुन सर्वाधिक गाणी, पुस्तके आणि ग्रंथ लिहिले गेले आहेत व अजून ही लिहिले जात आहेत. तसेच दररोज हजारोच्या पटीने त्यांचे अनुयायी जगभरात वाढत असतात.विशेष म्हणजे त्यांच्या हयातीत डॉ.आंबेडकरांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी मार्च १९४६ मध्ये कराची येथून प्रकाशित केलेला “डॉक्टर आंबेडकर ” हा चरित्र ग्रंथ, डाॅ. आंबेडकर चरित्र लेखनाचा प्रारंभबिंदू आहे . हे पुस्तक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे .

१६)ब्रिटिश कालीन गव्हर्नर राज्यपाल लॉर्डलिलिथगो आणि महात्मा गांधी यांचा असा विश्वास होता की बाबासाहेब ५०० पदवीधर आणि हजारो विद्वानांपेक्षा बुद्धिमान आहे.

१७)डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले आणि एकमेव सत्याग्रही आहेत की ज्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला.

१८)सन १९५४ मध्ये नेपाळच्या काठमांडू शहरात झालेल्या “जागतिक बौद्ध परिषद” मध्ये बौद्ध भिक्षूंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्मातील सर्वोच्च “बोधिसत्व” ही पदवी दिली. त्यांनी लिहिलेला “द बुद्ध आणि त्याचा धम्म” हा प्रसिद्ध ग्रंथ भारतीय बौद्धांचा “पवित्र” ग्रंथ म्हणून ओळखला जातो.

१९)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या तीन महान माणसांना त्यांचे “शिक्षक” म्हणून मानले होते.

२०) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातले असे एकमेव नेते आहेत की जगात सर्वच देशात सर्वाधिक पुतळे आहे. त्यांची जयंती देखील जगभरात साजरी केली जाते.

२१)डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातील एकमेव पहिले वकील होते.

२२) “मेकर्स ऑफ युनिव्हर्स” नावाच्या जागतिक सर्वेक्षणानुसार ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षातील पहिल्या १०० मानवतावादी लोकांची यादी तयार केली, ज्यात चौथे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे होते.

२३)डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ “रुपयाची समस्या – त्याचे उद्भव आणि त्याचे समाधान” यात लिहिल्याप्रमाणे सध्याच्या काळात सर्वत्र चर्चा होत असलेल्या नोटाबंदीविषयी अनेक सूचना दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ग्रंथात असे वर्णन केले आहे की, “जर कोणत्याही देशाला काळा पैसा आणि बनावट चलन हटवायचे असेल तर दर दहा वर्षांनी देशाचे चलन डिमोनाइझ केले जावे.”

२४)जगातील सर्वत्र तथागत बुद्धाचे बंद डोळ्याचे पुतळे आणि
चित्रे दिसतात, पण एक चांगला चित्रकार असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाची पहिली पेंटिंग केली की ज्यामध्ये बुद्धांचे डोळे उघडले गेले.

२५)डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या हयातीत त्यांचा पुतळा सन १९५० मध्ये मराठा समाजातील एका व्यक्तीने महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात बसविला.

-Team
www.ambedkaree.com

Next Post

साहित्य कला क्षेत्रात मनाचा " पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर.

शनी सप्टेंबर 7 , 2019
साहित्य कला क्षेत्रातील मनाचा असणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्काराची घोषणा मराठी साहित्यात आपल्या अनोख्या शैलीने जातीय उतरंडीत नव्या जगण्याच्या वास्तव दर्शन घडवून अख्या साहित्य जगाला हादरवून दलित साहित्याला नवा आयाम देणारे थोर साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या […]

YOU MAY LIKE ..