राजकीय बदलाचे मारेकरी ?

राजकीय बदलाचे मारेकरी ?

मागील पिढीतील साहित्यिक श्री.म.माटे यांचे ” उपेक्षितांचे अंतरंग ” हे पुस्तक खूप गाजले. याचे कारण माट्यांनी एक नवा विचार मांडला होता. देशाची एका वाक्यात त्यांनी व्याख्या केली होती.

” देश म्हणजे देशातील माणसे ” ही साधी आणि सोपी व्याख्या! परंतु माटेंची भूमिका पटली नाही. याचे कारण त्यांचा बहुजनवाद्अडे असलेला कल होय! परिणामत: माटे उच्चवर्णिय असूनही त्यांची स्वकीयांकडूनच अवहेलना झाली. ‘महार माटे ‘ याशब्दात त्यांना हिणवले गेले. ‘ उपेक्षितांचे अंतरंग ‘ ची आठवण येण्याचे कारणही त्या नावातच आहे. उपेक्षित म्हणजेच वंचित. माणसासारखा माणूस असूनही केवळ तो मागास प्रवर्गातील असल्याने तो विविध नावाने ओळखला गेला. प्रबोधन पर्वात सुधारणेचा मुद्दा उपस्थित केला असता तो शुद्र होता. १९५७ साली अॅड. बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या ” दलित साहित्य संमेलना ” चे स्वगताध्यक्ष असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनीही ‘दलित’ शब्दावर जोर देत त्याच्या समर्थ्याची जाणिव करून दिली होती. थोडक्यात दलित या शब्दाच्या व्याख्येचा शोध घेता, हीन, उपरा, गुलाम या अर्थानेही संबोधण्यात आले. तो जसा शुद्र होता तद्वतच तो अस्पृश्यही होता. ज्याचा स्पर्श करण्यास मज्जाव करण्यात आला तो अस्पृश्य! घाणेरडा, ज्याच्या अंगाचा दुरूनही दुर्गंधी येत असल्याने त्याला बहिष्कृत ठरविण्यात आले. रंग, रूप, राहणीमान, आहार, उच्चार, आचार या कसोट्या लावून जे कोणी रा प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढे येत असत, त्याला वरील कसोट्यांचा आधार घेत, नाउमेद केले जात असे. मग माझ्यासारख्याला एक प्रश्न भांडावून सोडतो, तो म्हणजे या सर्व कसोट्यांचा विचार करता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कसोट्यांच्या पलिकडचे व्यक्तिमत्व असूनही त्यांना अस्पृश्यतेचा त्रास का व्हावा? इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाने ब्रिटिशही ज्यांच्यावर फिदा होत असत, त्यांच्या युक्तिवादाला दाद देण्याचा मोह आवरता आला नाही. ( डाॅ.बाबासाहेबांच्या या बौद्धिक सामर्थ्यामुळेच ब्रिटिश व्हॉईसरायच्या मंत्रामंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव असे भारतीय होते हे व्यवस्थेच्या ठेकजदारांना माहित नाही काय?)
जातीव्यवस्थेवर कठोरपणे प्रहार करीत समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
जातीच्या नावावर राजकारण करीत असल्याचा नेहमीच आरोप करण्यात येतो. आरक्षणाची ढाल पुढे करून जातीव्यवस्था टिकविण्याचे काम आगासवर्गिय नेते करीत असल्याचा आरोप करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जाते ते थांबले पाहिजे. जाती कोणाला हव्यात याचे तर स्पष्टीकरण होऊ द्या. जात हा कळीचा मुद्दा असेल तर जाती निर्माण कोणी केल्या? जातीचे निर्माते कोण आहेत हे तरी स्पष्ट करा ना? जात, पंथादी प्रकारांना कोणी थारा दिला? जात कहा समाजाला लागलेली किड आहे अशी वाक्ये व्याख्यानमालांमध्ये जमलेल्या निरागस श्रोत्यांच्या तोंडावर फेकून टाळ्या मिळविणा-यांनी जातीचे उगमस्थान असणारे मूळछ छाटून टाका म्हणजे कळीचा मुद्दा आपोआप नष्ट होईल ही मागणी का करत नाहीत? जातीचा उगम धर्मग्रंथांमध्ये आहे. वैदिक संस्कृतिने वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली नसती तर या देशात जातीची उतरंड निर्माण झाली नसती. आरक्षण हा आमचा अधिकार असून तो संविधानिक असल्याचे मागासवर्गीय जेव्हा बोलतात त्यावेळी कोणता निकष लावला जातो? जाती नको म्हणणारेच जातींना कवटाळतात ते कशासाठी? आम्ही जातीधर्माच्या पलिकडचा विचार करतो असे म्हणणारे त्यांची मुलगी किंवा मुलाने अन्य जातीतील लग्न केल्यास टोकाची भूमिका घेतली जाते? जातीचे विष समाजाच्या अंगी एवढे भानले आहे की, आॅनर किलिंगच्या घटना घडविण्यास लोक कमी करत नाहीत. जातीवर आधारित राजकारण केले जात नाही? सर्व धर्म समान आहेत असे प्रवचन करणारे, धर्मोपदेश करणारे तथाकथित पंडित, आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे याचा आग्रह का धरतात? हिंदू हा धर्मच नाही ती मुसलमान बादशहाने दिलेली शिवी आहे. दगाबाज, विश्वासघातकी या शब्दात हिंदुंची संभावना करण्यात आली आहे। ज्याचे मूळ पर्शियन भाषेत सापडते. जातिंपेक्षा ईश्वराचे मानलेले अवास्तव दिलेले महत्व. श्रद्धेचा मुलामा दिलेल्या ईश्वर भक्तीच्या अतिरेकाने जातींना दूर ठेवण्यास भाग पाडले. आजही अनेक गावांमध्ये मागाहवर्गियांना मंदिर प्रवेश नाकारला जातो यामागे कोणती माऩसिकता आहे? प्रत्येक प्रणीमात्र ईश्वराची रूपे आहेत असे धर्म सांगत असेल, तर मग धर्माच्या ठेकेदारांना धर्माचा आधार घेत मंदिर प्रवेश का नकारला जातो? या प्रश्नावर जो कोणी बोलण्याचा, विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्याला बहिष्कृत केले जाते. त्याच्या घरावर हल्लाबोल केला जातो हे वास्तव धर्माचे ठेकेदार नाकारू शकतात? जातिचे निर्माते कोण आहेत ?या प्रश्नाचे उत्तर दिले कुमार केतकर यांनी. धर्माच्या ठेकेदारांना विसर पडला असण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये परभणी येथे आयोजित केलेल्या ” अखिल भारतीय बहुभाषिक ब्राम्हण अधिवेशना”त बोलताना पत्रकार कुमार केतकर यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला. त्याला विरोध झाला. पत्रकार केतकर यांच्या भाषणाचा आशय पुढीलप्रमाणे होता. कुमार केतकर यांनी जातीपातीचा बिमोड होणे किती गरजेचे आहे हि मागणीच केली. हजारो वर्षांपासून समाजातील एक मोठा वर्ग, घटक सामाजिक अधिकारापासून उपेक्षित राहिला. जातीयतेचे चटके सहन करूनही हा वर्ग आपल्याच धर्माचे गुणगात राहिला. पण आम्ही त्याला काय दिले? त्याच्या वाट्याला अवहेलनाच आली. भारतीय संविधानामुळे निदान या समाजाला समतेचे अधिकार तरी प्राप्त झाले. केतकरांच्या भाषणाने ब्राम्हणांमध्ये घालमेल होत होती.

त्यांच्या भाषणादरम्यान अधूनमधून शेरेबाजी करणय्ता आली. केतकर म्हणाले, ‘ ब्राम्हण समाजाला अजूनही संधी आहे, मागासवर्गिय समाजाला न्याय मिळवून देऊया. कारण इतिहास स्पष्ट सांगतो, ब्राम्हणच जातीवादाचा निर्माता आहे.’ केतकरांच्या या वक्तव्यावर सारे ब्राम्हण खवळले, काही युवक विचारपीठासमोर येऊन भाषण बंद करण्याची मागणी करू लागले. केतकर म्हणाले। ‘हे माझे बीजभाषण आहे. याची लिखितप्रत आयोजकांना एक महिना आगावू दिली असल्याने तुम्ही अडवू शकत नाही. सभागृहात शांतता पसरली. केतकर चिडले होतेच. ते म्हणाले
१) ब्राम्हणांनी या देशात जाती निर्माण केल्या अर्थातच तो जातीचा निर्माता आहे
२) जाती नष्ट करण्यासाठी ब्राम्हणांनीच पुढाकार घ्यावा.
३) संविधानामुळे सर्वाधिक फायदा ब्राम्हणांचाच झाला. विशैषत: ब्राम्हण स्त्रीयांचा.
४) स्वांतंत्र्योत्तर भारतात ब्राम्हणांनीच सुमारे ६० टक्के सवलती लाटल्या. ब्राम्हण महिलाच शिकल्या,त्या शिक्षिका, प्राध्यापिका, न्यायधीश, नगरसेविका, आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, बँक मॅनेजर, पायलट-वेमानिक, इंजिनिअर,बनल्या अशावेळी आमचे कर्तव्य बजावणार आहझत की नाही?
असा प्रश्न करताच ब्राम्हण खवळले केतकर हटावच्या घोषणा झाल्या. केतकर भडकले. ते म्हणाले, ” तुमच्या या अशा वागण्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करावे लागले. असे म्हणताच ब्राम्हण चिडले. केतकरांचा माईक बंद करण्या आला. त्यांना फरफटत खाली आणले. काहींनी धक्काबुक्कीही केली. आयोजकांनी कसेतरी त्यांच्या गाडीपर्यंआ सोडले.तरीही संतापलेल्या ब्राम्हणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. दोन-चार दगडही फेकले. त्यांच्या भाषणाचा पराणाम असा झाला की, लोकसत्तेच्या संपादक पदावरून तडकाफडकी हटविण्या आले. २००८ मध्ये ठाण्यातील कोपरी येथील त्यांच्या घरावर हल्लखबोल करण्यात आला. जिवे मारणे हाच हेतू होता. महिना उलटला तरी परभणी ब्राम्हण अधिवेशनातील कोणी ‘ब्र’ काढला नाही. अपवाद फक्त आम्ही दोघेच. भिवंडीचे प्रा.भगवान भोईर आणि मी! भगवान भोईर लोकनायकमध्ये स्तंभलेखन करीत असल्याने तात्काळ एक लेख छापून आला. मी या घटनेवर ‘ दै विश्वसम्राट’ मध्ये १५ लेखांची मालिकाच लिहिली होती. त्यावेळी राजाराम म्सके आणि संतोष गायकवाड हे अनुक्रमे संपादक , उपसंपादकपदाची धुरा वाहर होते.
(क्रमश:)

गुणाजी काजिर्डेकर,
गुरूवार, दि. २५ जुलै,२०१९

Next Post

खासगी उद्योगांतही आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार : न्या अभय ठिपसे

मंगळ जुलै 30 , 2019
खाजगी उद्योगातही आरक्षण ! राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे सरकारला अधिकार ! न्या. अभय ठिपसे मुंबई , दि. 28 जुलै: देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकत्र्यांमध्ये इच्छाशक्ती […]

YOU MAY LIKE ..