गणराज्य अधिष्ठानचा परिसंवाद मुबई मराठी पत्रकार संघात यशस्वीपणे पार पडला

मुंबईत कोसळधार पाऊस असतांनाही शुक्रवारी गणराज्य अधिष्ठानचा परिसंवाद मुबई मराठी पत्रकार संघात यशस्वीपणे पार पडला। जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली असतांनाही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या बांधव- भगिनींना देऊ तितके धन्यवाद थोडेच ठरतील।

या परिसंवादाचे प्रमुख अतिथी माजी न्यायमूर्ती अभयजी ठिपसे आणि उदघाटक भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर हे वेळेआधीच उपस्थित झाले होते। राज्याचे माजी समाजकल्याण आयुक्त आर के गायकवाड हे तर पुण्याहून खास आले होते। तर, भाजप नेते आमदार भाई गिरकर यांचे आगमन परिसंवाद सुरू झाल्यावर झाले।

या परिसंवादाला ठाण्याहून एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख वंदना कांबळे या भर पावसात आपल्या महिला कार्यकर्त्यांसह आल्या होत्या, हे विशेष। तर, आंबेडकरी चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते एका जाणिवेतून येऊन अखेरपर्यंत या परिसंवादात थांबून होते। त्यात रिपब्लिकन नेते राजारामजी खरात, रिपाइंच्या बेरोजगार आघाडीचे नेते चंद्रकांत जगताप, रिपाइंचे ज्येष्ठ नेते तानाजी गायकवाड, लोकजनशक्ती पार्टीचे नेते रवी गरुड, भीम आर्मीचे प्रमुख अशोक कांबळे,आर टी गमरे, प्रा व्यंकट माने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते विलासभाई निकाळे, रिपाइंचे पवनकुमार बोरुडे, ऍड नाना आहिरे, महापालिका कामगार नेते दादू लव्हांडे, वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिल ओव्हाळ, पत्रकार सुबोध शाक्यरत्न,सामाजिक कार्यकर्ते जगदीश नगरकर, रमेश मोकळ, रमाबाई कॉलनीतील माझे जुने मित्र असलेले कार्यकर्ते प्रकाश नेवे, अनिल केदारे , कैलाश केदारे,बहुजन संग्रामचे भीमराव चिलगावकर अशा अनेकांचा समावेश होता।

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते जयंत दिवाण हे आदल्या दिवसापासून तापाने फणफणले होते। त्यांना उपस्थित होणे अशक्य झाले होते। तर, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेते आमदार भाई जगताप हे कार्यक्रमाला येत आहेत, असे त्यांच्या कार्यालयीन निकटवर्तीयांनी ‘कन्फर्म’ केले होते। पण कदाचित मुसळधार पावसामुळे कार्यक्रम होण्याबाबतची साशंकता वाढल्यामुळे त्यांनी आणि शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी मुंबईच्या दिशेने निघण्याचा विचार ऐनवेळी बदलला असावा।

पाऊस कोसळत असतांनाही उपस्थित होऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार।
माजी न्यायमूर्ती अभयजी ठिपसे, उदघाटक भीमरावजी आंबेडकर, आमदार भाई गिरकर, आर के गायकवाड यांना विशेष धन्यवाद।
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणराज्य अधिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्य यांनी घेतलेल्या परिश्रमाला तर तोडच नाही!

आजच्या काळात केवळ दलित मागासवर्गीय, बहुजन संघटनाच नव्हे तर राजकीय पक्षांनीही खासगी उद्योगासाठी आरक्षण लागू करण्यासाठी रान उठवावे अशी अपेक्षा आहे। नव्हे ती काळाची गरज आहे।

Next Post

बहुजनवादी बनत आहे आॅटिझमचा बळी?

मंगळ जुलै 30 , 2019
बहुजनवादी बनत आहे आॅटिझमचा बळी? पावसाने मनुष्याचे चांगलेच गर्वहरण केले आहे. आपल्यासारखा सर्व शक्तीमान कोणी नाही असा वृथा व दांभिक अभिमान बाळगणा-या माणसा तू किती क्षुद्र आहेस असेच जणू पावसाला म्हणायचे असेल काय? आज म्हणजे आता १२ वाजून १५ मिनिटांनी तीन […]

YOU MAY LIKE ..