ऐतिहासिक क्रांतिकारक दलित पँथर चे सहसंस्थापक राजा ढाले यांचे निधन…!


दुःखद वार्ता

राजा ढाले यांचे निधन…!

ऐतिहासीक क्रांतिकारक दलित पँथर चे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. 16 जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.


त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दि. 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.

राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ;मार्गदर्शक; दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Next Post

वणवा पेटवणारा तिसरा निखारा विझला...!

मंगळ जुलै 16 , 2019
दलित पँथरचा महानायक:राजा ढाले-दिवाकर शेजवळ,जेष्ठ पत्रकार ‘भारतात कोणी व्होल्टेअर जन्माला आला नाही;म्हणून या देशात सामाजिक kraanti होऊ शकली नाही,’असे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच सांगितले होते। पण इथे व्होल्टेअर जन्माला न येण्याचे कारण तुम्हाला मी आता सांगतो। दुर्गाबाई भागवत कुमारी राहिल्या। […]

YOU MAY LIKE ..