”
अॅड.बाळासाहेब आंबेडकर आरएसएस- बीजेपीचे हस्तक असल्याचा तथ्यहीन आणि राजकीय आरोप अमान्य”
प्राचार्य म.ना.कांबळे,
अध्यक्ष, फुलेआंबेडकर विद्वत सभा
वंचित बहुजन आघाडीची स्थापना वंचितांची सत्ता निर्माण करण्यासाठी झाली, परंतू सत्तेसाठी व स्वार्थासाठी आंबेडकरी विचारांशी तडजोड कदापिही केली जाणार नाही ही ठाम भूमिका अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. त्यांनी तडजोड केली असती तर ते सत्तेच्या राजकारणात मोठ्या पदावर केंव्हाच विराजमान झाले असते.
स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ आणि सत्तेचे राजकारण यात द्वंद/विरोधाभास असतो.लोकशाहीचे सामाजिकीकरण झाल्याशिवाय वंचितांची सत्ता येवू शकत नाही.म्हणून वंचितांचे अनेक जातवर्ग समुह एकञित आणणे व आंबेडकरी चळवळीत सक्रिय करणे व चळवळीला घातक ठरणार नाही अशी भूमिका घेणेआवश्यक असते. सत्तेसाठी घाई करता येत नाही. हे लक्ष्मण माने यांना समजून घ्यावयाचे नाही. किंवा त्यांना ते समजत नाही.म्हणून त्यांनी अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचेवर राजकीय गंभीर आरोप केलेत. ते मान्य नाही. त्यात काहीही तथ्य नाही.
लक्ष्मण माने वंचित बहुजन आघाडीत कसे आलेत व बाहेर कसे गेलेत याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यांना भारिप, फुले आंबेडकर विद्वत सभा,वंचित बहुजन आघाडी प्रत्येक ठिकाणी मानसन्मान होता.आद्यक्रांतीकारी उमाजी नाईक स्मारक पुणे येथे मे २०१८ मिंटींग झाली.
अॅड.विजय मोरे उपस्थित होते.९जून २०१८ ला एसएसपीएम पुणे येथे भटक्या विमुक्ताचे राज्य अधिवेशन झाले. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शना प्रमाणे मी आणि लक्ष्मण आरडे व भारिपच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व केले.याच काळात माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी पुणे येथे धनगर समाजाचा मेळावा घेतला. महाराष्ट्रात अनेक मिटिंग झाल्यात. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची पुणे येथे पञकार परिषद १८जून २०१८ ला झाली होती. याच पञकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची स्थापनेची घोषणा त्यांनी पञकार परिषदेत केली. वंबआचा धनगर समाजाचा पहिला एतिहासिक मेळावा पंढरपूरला झाला. नंतर महाराष्ट्रभर मेळावे झाले.दरम्यान फुलेआंबेडकर विद्वत सभा राज्य शिबीर इंटरनॅशनल टूरीस्ट हाॅटेल पुणे येथे झाले.अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण दिवसभर मार्गदर्शन केले.मायक्रो ओबीसी एकञ करण्याचा अजेंडा दिला होता. अॅड.विजय मोरे व लक्ष्मण माने, लक्ष्मण आरडे व ४०० प्रतिनिधी राज्यभरातून उपस्थित होते.
अशा प्रकारे सर्व ठिकाणी सर्व कार्यक्रमात अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे सोबत लक्ष्मण माने होते. लक्ष्मण माने यांनी मराठा समाजातील महिला संदर्भात टिपणी केली तेव्हा भडका उडाला होता. त्याच दिवसी प्रा.अविनाश डोळस सरांचे दुःखद निधन झाले होते. अॅड.बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादला आले होते.तशाही स्थितीत त्यांनी मराठा समाजातील महिलांची जाहीर माफी मागीतली व संभाव्य भडका थांबविला होता.
भारिप, विद्वतसभा पदाधिकांरी अन्य अनेक ज्येष्ठनेते, बुध्दीजीवीनेते, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमात मागे प्रेकक्षकात बसत होते.परंतु वंचित समुह व मुस्लिम समाज स्टेजवर असला पाहिजे असेच सर्वजन वागत होते.या संबधी लोक प्रश्न विचारत होते. परंतू त्याला आम्ही सर्व एकच उत्तर देत होतो.अॅड. बाळासाहेब आंबेडकर सर्वांचे नेते आहेत ते स्टेजवर आहेत म्हणजे आपणही स्टेजवर आहोत. असे सर्वजन मानत होते व मानतात.
एवढा मानसन्मान लक्ष्मण माने यांना व अन्य नेत्यांना होता व आहे.
लक्ष्मण माने यांनी बिनबुडाचे गंभीर आरोप करून,राजीनामा पञ देवून टी.व्ही.चॅनलला मुलाखती दिल्यात.तरीही अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, लक्ष्मण माने वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत वंचित बहुजन आघाडीत राहतील.तेव्हा सर्वजन शांत होते. तरीही लक्ष्मण माने यांनी दुसरी विडिओ क्लिप मध्ये तेच तुनतुने वाजविले.
यावर वंचित बहुजन आघाडी निर्णय घेईल. मी वंबआ पदाधिकारी नाही.पण वंबआ चा समर्थक व अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता आहे.म्हणून सर्व प्रकार बघून मी अस्वस्थ झालो. लक्ष्मण माने यांनी मला २६ जून २०१९ ला फोन केला होता.वंबआ सोडणार म्हणत अनेक आरोप केले होते.साहेबांसोबत बोला मिटिंग मध्ये चर्चा करा असे मी बोललो.मी फोन रेकाॅर्डींग करित नसतो. म्हणून सुरवातीला मी फोन रेकाॅर्ड केला नाही.पण ते फारच गंभीर आरोप करू लागले.मग मी रेकाॅर्डींग केले. अस्वस्थ झालो….!.
वंबआचे संस्थापक, अध्यक्ष व नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत.वंचित जनतेनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे.त्यांनी अनेकांना नेते केले.चळवळ शिकविली.कार्यकर्त्यांच्या चूका दुरूस्त करून नवीन संधी दिली. वंचित मधील अनेकजन लाखोंच्या स्टेजवर आणले. ते दुसरे आंबेडकर आहेत व नेते आहेत. हे जगजाहीर आहे.तरीही लक्ष्मण माने म्हणतात त्यांना आम्ही अध्यक्ष केले.परिस्थिती उलट आहे.लक्ष्मण माने यांना त्यांनी वंचितांचे नेतृत्व दिले.वंचित बहुजन आघाडीत येण्यापुर्वी लक्ष्मण मानेची अवस्था कशी होती?
लक्ष्मण माने साहित्त्यीक, पदमश्री , भटक्या विमुक्त संघटनांचे नेते आहेत. राष्ट्रवादीचे आमदार होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते मिञ आहेत.तरी त्यांच्यावर कोणी शंका घेतली नाही.खाजगीत लोक(एक भटके विमुक्त साहित्त्यीक प्राध्यापक) माझ्याजवळ बोलले.परंतू साहेबांनी निर्णय घेतला.लोक बदलतात असे म्हणून त्यांचे स्वागत केले.
वंचित ब. आ. त येण्यापूर्वी त्यांच्या शिक्षण संस्थातील महिलांनी सातारा येथे त्यांच्या विरूध्द बलात्कारांचे खोटे गुणे दाखल केले होते. बीजेपी चा भटक्या विमुक्ताच्या एका नेत्याचा जावई व लक्ष्मण मानेचा विरोधक असलेल्या एका पुरोगामी प्राध्यापकाने फुस लावल्याने पुण्यातील काही महिला कार्यकर्त्यांनी व राष्ट्रवादीतील त्यांच्या विरोधकांनी लक्ष्मण माने यांचे जगणे कठीण केले होते.
तेव्हा आंबेडकरी जनतेने सत्यशोधन होवू दे.अशीभूमिका घेवून लक्ष्मण माने यांना संरक्षण दिले होते.आमचाही त्यात समावेश होता. त्या काळात लक्ष्मण माने चळवळीतून संपले होते. त्यांची पूर्वपिठीका दुर्लक्षीत करून त्यांना सन्मानाने नेतृत्व दिले.राजकीय पुनर्वसन केले.महाराष्ट्र प्रवक्ते व पार्लमेन्टरी बोर्ड सभासद केले.
वंचित बहुजन आघाडीत आरएसएस व बीजेपी ची घूसखोरी झाली हा आरोपही राजकीय चातूर्यातून त्यांनी केला आहे.त्यात त्यांचा स्वार्थ आहे.वंबआ त फूट पाडून त्याचे बक्षीस म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीकडून एमएलसी/ आमदार होणे हे त्यांचे उद्दीष्टआहे. ही काँग्रेस राष्ट्रवादीची सध्याची गरज आहे. लक्ष्मण माने यांना काहीच समजत नाही असे नाही. पण ते स्वार्थी राजकारणास बळी पडले.
राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपीला २०१४ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बिशर्त पाठिंबा दिला होता. लक्ष्मण माने यांनी साहित्त्यीक व तत्वनिष्ठ असल्याचा आवा आणत राजकीय खोडसाळ आरोप केलेत. ते तथ्यहीन असल्यामुळे अमान्य आहेत.
कारण उघड आहे.कोणतीही व्यक्ती प्रतिगामी,धर्मांध,जातीवादी भूमिका सोडून वंचित बहुजन आघाडीत येत असेल व त्यांची क्षमता असेल तर त्यांना प्रवेश देवून पद देवू नये काय? लक्ष्मण माने हे आंबेडकरवादी असल्याचे सागंतात तर व्यवस्था परिवर्तन कशी करणार? लक्ष्मण माने धर्मांतर करून बौध्द झाले. तरी परिवर्तनावर विश्वास नाही? गोपीनाथ पडळकर व डाॅ.अंजेरिया यांच्या नावाने आक्रोश का? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व एवढे साधे आणि सोपे समजता काय?
अॅड.बाळासाहेब आंबेडकर शिस्तप्रिय व स्वाभिमानी, बुध्दीवादी, खंबीर नेतृत्व आहे.पक्ष व चळवळ वाढीसाठी व समाज हितासाठी कार्यकर्त्यांना शिस्तलावणे, चुकीची कामे थांबविणे,वेळप्रसंगी कानउघडणी करणे,समजावून सांगणे, मार्गदर्शन करणे, मदत करणे, आवश्यक असेल कारवाई करणे. पक्षाचे व चळवळीचे ध्येय धोरण ठरविणे हे नेत्याचे कर्तव्य असते. हे करतांना सर्वांशी संवाद होईलच याची हमी नसते.पदाचेही तसेच आहे.पदांची महत्वाकांक्षा असली तरी सर्वांनाच पदे मिळतील याची हमी नसते.तशी अपेक्षाही करू नये.हे साधे तत्व समजून घेतल व काम करित राहिले तर पक्ष पदाची संधी देतो. या अर्थाने अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाचा विचार न करता आरोप करणे चूकीचे आहे.ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.त्यांचे बरोबर वैचारिक वारसदार आहेत.ते कर्तव्य कठोरच वागतील.
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाचे कोणते नुकसान केले व कोणता स्वार्थीपणा केला? याची चर्चा लक्ष्मण माने यांनी जाहीरपणे आमच्या सोबत करावी हे आव्हान देत आहोत. लक्ष्मण माने सरंजामी मराठा काँग्रेसची भाषा बोलत आहेत.
राजकीय पक्षात एकमत असतेच असे नाही.मतभेद बंद खोलीत मांडता आला असता. माञ लक्ष्मण माने यांना राजकीय शिस्त मान्य नाही.त्यांनी तक्रारमिंटीग मध्ये मांडणे आवश्यक होते. ते लेखी तक्रार किंवा मत मांडू शकत होते. लोकशाहीत ही संधी असते. बहुमतांचा निर्णय झाला असता. तो राजकीय पक्षात पाळावा लागतो.
तसे न करता दुश्मन करतो तसा आरोपांचा हल्ला करणे यात कोणते तत्व अन कोणती लोकशाही लक्ष्मण माने यांनी पाळली?
लक्ष्मण माने यांना हे माहित आहे की, एक आमदार,एक खासदार, एकमंञी कांही करू शकत नाही. व्यवस्था बदलवू शकत नाही.तेवढ्या साठी आंबेडकरी वंचित बहुजनाची चळवळ बळी द्यायची काय?
याचा लक्ष्मण माने यांनी काहीही विचार केला नाही.स्वार्थासाठी राजकीय आरोप करून मोकळे झाले.जे काँग्रेसला राष्ट्रवादीला हवे ते तुम्ही करित आहात. शेवटी निर्णय तुमचा. लोकशाही आहे. तुम्हाला बाहेर पडण्याचा अधिकार आहे.
माञ तुमच्या राजकीय तडजोडीला तत्वनिष्ठेचा व आंबेडकरवादी असल्याचा ताव आणू नका. एवढेच
एक माञ नक्की की,तुमचा निर्णय तुम्हाला वंचित बहुजनाचा खलनायक म्हणून ईतिहासात नोंदवेलप्रस्तुत लेख प्राचार्य एम एन कांबळे अध्यक्ष फुलेआंबेडकर विद्वत सभा यांच्या FB वॉल वरून सभार घेतला असून प्रस्तुत लेखक हे वंचित बहुजन आघाडीचे जवळचे साक्षीदार आहेत.