कट्टर वाद्यांना उत्तर जय भीमचे…….!- खासदारओवेसी यांनी जय भीम म्हणत आपल्या शपथेचा शेवट केला.  

भारतीय संसद हे कायदे बनविणारे सर्वोच्च ठिकाण .देशातील प्रत्येक नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या प्रतिनिधित्वतेची आणि देशाच्या मूल्य अन अखंडत्वाची एकनिष्ठ अन प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात .


कुणी आपल्या मातृ भाषेत ,तर कुणी आपल्या ईश्वराच्या साक्षीने तर कुणी अल्लआह ला स्मरून तर कोण भारत माता की की जय बोलून शपथ घेत असतात. नुकतीच नव्या लोकसभेत भाजप बहुमताने निवडून आले आहे.
कट्टर देशभक्ती, धार्मिक कट्टर विचाराचे लोक आपले मत दुसऱ्यावर लादण्याचा केविलवाणा प्रयोग करत आहेत .
आशा लोकांची निवड देशाच्या सर्वोच्च ठिकाणी करून ही हे लोक आपली मर्यादित मानसिकता दाखवत असतात.असेच घडले…..!

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज खासदारकीची शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यावेळी ओवेसी यांनीदेखील अजून जोरात घोषणा द्या असं म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

खासदारकीची शपथ घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसींची ‘जय भीम’ची घोषणा!

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज खासदारकीची शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यावेळी ओवेसी यांनीदेखील अजून जोरात घोषणा द्या असं म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ओवेसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम म्हणत शपथेचा शेवट केला.  


ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम अशी घटना निर्माण केलीं त्या महामानवाला मानवंदना म्हणजेच जय भीम …..!

याच सर्वोच्च सभागृहात त्यांच्या नावाचा उद्घोष कातून देशात समता ,स्वतंत्र अन बंधुता रुजविण्याचे कार्य लोकशाही पद्धतीने केले पाहिजे .खासदार ओवेसी यांनी केलेली जय भीम ची घोषणा ही लोकशाही दृढ करण्यास आम्ही जीवंत आहोत हेच दर्शविणारे ठरणार आहे.

लोकसभेत निवडणूक आलेल्या खासदारांचा शपथविधी सोमवारी पार पडला होता. लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली होती. अकबरुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधील चंद्रायन गुट्टा मतदारसंघातून विजय झाले आहेत.

सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे पहिलंच अधिवेशन आहे. 

Next Post

धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस- मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक

शनी जून 22 , 2019
धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून …..मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक सुबोध मधुकर जाधव या तरुणाची व्यवसाय करण्याची धडपड … आपला मुलगा काहीतरी करू इच्छित आहे तयाला सहकार्य करून आपल्या सरकारी नोकरीतून त्याला पूर्णपणे […]

YOU MAY LIKE ..