अस्मिता एक आर्थिक चळवळ…..ही संस्था कोणताही गवगवा न करता अविरतपणे काम करतेय…..! बहुजन समाजातील तरुण उद्योग व्यवसायात यावेत त्यांनी आपली अर्थव्यवस्था निर्माण करावी आणि विविध उद्योग निर्मितीच्या संकल्पनाना योग्य पर्याय निर्माण व्हावा म्हणून काम करत आहे.
याची सुरुवात स्वतः पासून करणारे अस्मिताचे उपाध्यक्ष मा किरण तांबे यांचे बंधू आणि अस्मिताचे सदस्य इंजि.सुशांत तांबे आणि त्यांच्या सहकारी या दोन तरुणांनी नुकतेच हॉटेल व्यवसायात आपले पदार्पण केलेय.
स्वतःचा सोलर सायकल निर्मिती चा व्यवसाय करत त्यांनी आता चायनीज रेस्टॉरंटमध्ये आपले पदार्पण केलेय.
बदलापूर हे सध्या निसर्गाच्या कुशीत असलेले स्मार्ट शहर आहे या शहरात आपले बालपण आणि शिक्षण घेणारे सुशांत तांबे हे एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे .
सतत नव्या नव्या कल्पना त्यावर मेहनत घेऊन ते काम पूर्ण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे .
अस्मिता च्या आर्थिक चळवळीला दिशा देण्यासाठी मोठे बंधू किरण तांबे काम करत आहेत . त्यांनी पूर्णवेळ व्यवसायिक होणे पसंत केले असून ते कॉस्मोटिक उत्पादन करत आहेत .
घरातील असलेल्या व्यवसाहिक वातावरणात सुशांत यांनी पहिला सोलर सायकल निर्मिती केलीय.
आता आपल्या व्यवसाहिक मित्रबरोबर चायनीज रेस्टॉरंटमध्ये ते सक्रिय झालेत.
www.ambedkaree. com शी बोलताना ते आपला प्रवास कथन करताना म्हणाले
आपल्या बौद्ध समाजाने आता आर्थिक परिवर्तन केले पाहिजे. कित्तेक वर्षे आपला समाज हा नुसता सरकारी नोकरीच्या जाळ्यात अडकून पडला आहे आणि खाजगी नोकरीत सुदधा. ह्यातून बाहेर पडून हे एक उचलले पाऊल आहे. ह्यासाठी “अस्मिता” संस्थेतील मान्यवरांच मार्गदर्शन सुद्धा कामी आले.
ह्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये मध्ये उत्तम प्रतीचे फ्राईड राईस, फ्राईड नूडल्स, अमेरिकन चॉप्सी इत्यादी अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ केले जातात.
आणखीन माहिती देताना म्हणाले की
ह्याच बरोबर पुढील काही दिवसात त्याच ठिकाणी फ्रुट ज्युस कॉर्नर उघडायचे ठरविले आहे. शेवटी एकच सांगेन नुसता बौद्ध समाज नाही तर कोणत्याही समाजातील किंवा कोणत्याही प्रवर्गातील व्यक्तीला जर मार्गदर्शन आणि व्यवसाईक मदत पाहिजे असेल तर त्यांनी “अस्मिता” संस्थेशी संपर्क करावा.
आपला बहुजन समाज वर्गणीदार नाही तर देणगीदार घडवायचा आहे .
तरुण बहुजन वर्गातील असला तरी त्यांनी प्रोफेशनल व्यवसाहिक पणे वाटचाल सुरू केलीय . ज्या प्रकारे बाकीचे रेस्टॉरंटमध्ये पदार्थ मिळतात त्याच प्रमाणे इथेही ते दिले जातात मात्र चव आणि वेगळेपण आहे .खास करून वेगवेळ्या चायनीज डिशेस आणि त्याची सर्व करण्याची पद्धत नवी आहे .
चला मग निसर्गाच्या कुशीत अन आधुनिक शहर बदलापूर मध्ये …
अमर जाधव
www.ambedkaree.com