सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे महिला धम्म प्रशिक्षणासह,
देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन
सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत उपासिका महिला धम्म प्रशिक्षण शिबीर मुटाट, कासार्डे व चेंदवण येथे ३१ मे २०१९ ते ९ जून २०१९ या कालावधीत संपन्न झाले. तिन्ही धम्म प्रशिक्षण शिबीरादरम्यान भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री भिकाजी कांबळे यांनी आवर्जून भेटू देऊन, उपक्रमाचे कौतुक केले. तर, समारोप कार्यक्रम दिनी मुटाट येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्द अंतर्गत देवगड उत्तर विभाग तालुका शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून, सिद्धार्थ साळुंके यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात धम्म चळवळ व्यापक करण्याचा सर्वांनी संकल्प केला. मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्तीनिमीत्त संजय जाधव यांचा जिल्ह्याच्यावतीने सत्कारही करण्यात आला.