मुंबईत स्थानिक कोकणातील आंबेडकरी तरुणीचा जर्मन प्रवास

अभिनंदनीय आणि अभिमानास्पद

कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे गावातील तरुणीचा जर्मनीत प्रवास आणि तिने सादर केले जर्मन भाषेत प्रेसेंटशन.

मुंबई विद्यापीठात एम ए जर्मन भाषेत करणारी कुमारी तेजस्विता शिवराम जाधव या मुंबई विद्यापीठातुन जर्मन भाषेमध्ये एम. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाकडून त्यांची जर्मनीत GIP Project (Germanische institutions Partnership) presentation देण्यासाठी निवड झाली.

त्यानिमित्ताने नुकतेच त्यांनी मुंबई विद्यापीठ यांच्यामार्फत त्यांनी तिथे आपल्या प्रोजेक्ट चे प्रेझेन्टेशन सादर केले .

हर्दखळे गाव हा सह्याद्रीच्या कुशीत सुंदर आशा निसर्ग लाभलेला दुर्गम गाव आहे .काही काळ प्राथमिक शिक्षण या गावात घेऊन पुढे वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्या आई आणि मोठ्या बंधुबरोबर मुंबई नायगाव दादर या ठिकाणी वास्तव्य करून आपलें शिक्षण पूर्ण केले .

घरात वडिलांचा शैक्षणिक वारसा लाभलेल्या तेजस्विता याना वडिलांच्या अचानक जाण्याचे खूप दुःख होते.मात्र भाऊ आणि आई यांच्या पाठिंबा होता आणि आपलें शिक्षण पूर्ण करण्याचा मानस हा यशाकडे घेऊन गेला.
जर्मन भाषा एम ए ला निवडून त्यात यश संपादन करणारी तेजस्विता खरे तर खूप अबोली आहे.
तिचा स्वभाव बोलका नसला तरी मन आणि विचार प्रगट करण्याची कला वाखाणण्यासारखी आहे.

थोडक्यात : कुमारी तेजस्विता ह्या हर्दखळे गावातील एक सुपुत्र आणि जुन्या काळी जे काही सुशिक्षित तरुण गावात शिकले आणि मोठे झाले त्यातील अत्यंत हुशार व मुंबईतील महानगर पालिकेत मोठ्या पदावर राहिलेले दि शिवराम रामा जाधव यांची त्या कन्या असून दिवंगत शिवराम रामा जाधव यांचे दुर्धर आजाराने निधन झाले परिस्थितीमुळे ,आजारपणाने किंवा इतर कारणामुळे शिवराम रामा जाधव यांचे शिक्षणातील स्वप्न त्यांच्या कन्येने पूर्ण केले याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.
त्या निमित्ताने तिचे स्थानिक गावातील संस्था अर्थात हर्दखळे बौद्धजन संघ (रजि)मुंबई/ग्रामीण , भारतीय बौद्धमहासभा ग्रामशाखा हर्दखळे आणि माता रमाई महिला संघ हर्दखळे या संस्था हार्दिक अभिनंदन करीत आहेत .
-माहिती संकलन : रणजित रामचंद्र जाधव
-शब्दांकन : प्रराजा.
(प्रस्तुत तेजस्विता शिवराम जाधव ह्या www.ambedkaree. com चे संपादक प्रमोद रामचंद्र जाधव यांच्या चुलत भगिनी आहेत.)

Next Post

काँग्रेस स्वतःमध्ये सुधारणा करणार आहे की नाही?

शुक्र जून 7 , 2019
जेष्ठ पत्रकार आणि दै.बहुजन लोकनायक या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक मा दिवाकर शेजवळ सध्या सोशल मीडियावर बौद्धांची राजकीय वाताहात या विषयावर लेखमालिका लिहीत आहेत त्यांच्या या लेखमालेत भाग चौथा यात त्यांनी नोंदवलेले मत त्यांच्या शब्दात….! बौद्धांची राजकीय वाताहत भाग:4 आठवले आणि […]

YOU MAY LIKE ..