साम दाम दंड भेद या नीतीचा पुरेपूर वापर होऊन एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली.
महाराष्ट्रापुरते बघावयास गेलयास या निवडणुकीने काँग्रेस नेत्यांच्या गर्वाचा फुगा फोडला आणी बहुजनांची, वंचितांची, मुस्लिमांची ताकद खऱ्या अर्थने दिसून आली आहे .बाळासाहेब आंबेडकर ओवेसी आणि इतर काही पक्षांनी केलेल्या वंचित आघाडीला सीट्स च्या रुपात जास्त यश जरी मिळाले नसले तरी 38 लाख इतका प्रचंड जनाधार मिळाला आहे.यातून एक गोष्ट अशी घडली की काँग्रेसच्या भ्रमाचा भोपळा फुटला.या पुढे आपण राष्ट्रीय पक्ष असल्याचा बडेजावपणाचा आव त्यांनी सोडून द्यावा आणि महाराष्ट्रातील बहुजनांना गृहीत धरने सोडून द्यावे.
भाजपाची B टीम म्हणून खरंतर या आघाडीविरुद्ध भरपूर अपप्रचार केल्या गेला.
प्रस्थापितांच्या हातातले बाहुले बनून इतके वर्ष ही जनता उपेक्षित राहिली आणि ती तशीच राहावी हेच काँग्रेसला अपेक्षित होते पण या निवडणुकीत बहुजनांची ही प्रचंड ताकद पुढे आली आणि विशेष म्हणजे ही जनता कुणाच्या लाटेत वाहणारी नसून किंवा अंधपणे कुणाला मत देणारी नसून विचार करणारी समंजस आणि जागरूक मतदाता आहे.
या जनतेने काँग्रेसच्या दिगग्जना धूळ चारलीय.
यापुढे ह्या नवीन ताकदीला इथल्या राजकारणात गृहीत नक्कीच धरले जाणार नाही आणि येथील राजकारणात वंचित आघाडी निर्णायक राहील अश्या स्थितीत आली आहे याबद्दल मा. बाळासाहेबांचे अभिनंदन.
-जयश्री इंगळे
प्रस्तुत लेखिका आघाडीच्या इंग्रजी आणि मराठी न्यूज चॅनल व वृत्तपत्राच्या स्तंभलेखिका आहेत.