सामुदायिक मंगल परीणय सोहळ्याची जय्यत तयारी सुरू.
जनहीत चॅरीटेबल ट्रस्टचा महत्वकांक्षि ऊपक्रम!
दादासाहेब म्हणतात –
खरं तर स्वतःवरच विश्वास बसत नाही.जनहीत चॅरीटेबल ट्रस्ट स्थापने पासुन ते आतापर्यंतचा प्रवास अश्चर्यकारक आहे.अध्यक्ष अजय भवार व सर्व सहकार्यांनी समाजाचा व चळवळीचा भाग म्हणुन सामुदायिक मंगल परीणय सोहळा घडवुण आणण्याचे स्वप्न ऊराशी बाळगले होते.हेच धैय्य अद्दिष्ट समोर ठेऊन कामाला सुरुवात केली.
स्थापणे आधिच्या पहील्या मिटिंग पासुनच खडतर प्रवास सुरु झाला होता.ट्रस्टसाठी माणसांची निवड करणेपासुनच आव्हाने सुरु झाली होती.
राजकारणापालिकडे जाणारे समाजकारण
ते पुढे म्हणतात –
राजकारणापलिकडे जाऊन सामाजिक चळवळीत सातत्याने रीझल्ट देणार्या लोकांना प्राधान्य देऊन विश्वस्त व पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
वास्तविक हेच स्वप्न अनेकांनी ह्यापुर्वी पाहिलं होतं परंतु ते पुर्ण करण्याची संधी सामुहीक योगदानातुन पुर्ण होत आहे.
अनेक शंका कुशंका व क्षमतांच्या अविश्वासाचे अग्निदिव्य पार पाडावे लागले.
सुरुवात कशी केली ? सविस्तरपणे सांगताना म्हणाले –
सुरुवातीला अनेक मिटिंग्सला म्हणावे तेवढे विश्वस्तही येत नसायचे.ट्रस्ट नोंदणी झाल्यानंतर आम्ही ट्रस्टच्या प्रचारावर भर दिला.त्यासाठी पत्रके काढुण चैत्यभुमी,देहुरोड धम्मभुमी व भिमाकोरेगाव येथे प्रचार अभियान राबवले. सचिन कांबळे,संजय गायकवाड,प्रभाकर वाघमारे,सुनिल पवार,आनंद वंजारे,दलितानंद थोरात,सचिन भवार,प्रविण भवार सर,राजु आगळे,अनिल गायकवाड,सुभाष गायकवाड,ज्योतीताई शिंदे,अनिताताई गायकवाड,संदिप ओव्हाळ,निलेश शिंदे सारखि होतकरु अनुभवी टिम सज्ज झाली.
गावोगावी मिटिंग्स घेतल्या त्यातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला.सामुदायिक विवाह पद्धतीपासुन लांब राहणार्या बौद्धांना ऊत्तम पर्याय मिळाला.अशक्य वाटणारे काम यशस्वीतेकडे वाटचाल करु लागले आहे.
समाजातुनच फुल नाही तर फुलाची पाकळी घ्या म्हणणारे समाजबांधव पुढे आले.
चळवळ किंवा कोणताही उपक्रम करायचा तर खर्च आला व त्याबरोबर तो आणायचा कुठून हे ही महत्त्वाची जक्बाबदरी त्याबद्दल बोलताना सहज म्हणाले की –
महत्वाचा खर्च असलेले भोजन नगरसेविका अनिता पवार यांनी तर मंडप व्यवस्थेचा खर्च ट्रस्टचे विश्वस्त काशिनाथ भालेराव यांनी दान स्वरुपात भार ऊचलला.
चळवळीतील कार्यकर्ते आणि सम विचारी सहकारी यांचा सहभाग कसा आहे याबद्दल –
सुनिल पवार यांनी युद्धपातळीवर प्रत्येक यंत्रनेत सक्रीय सहभाग नोंदवला.गेले आठवडाभर कार्यकर्ते आंबेडकर स्मारकाजवळ जमा होतात.सामुदायिक मंगल परीणयाची चळवळ ऊभी राहत आहे.समाजघटकांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुंबंधनातुन समाजात एकोपा व जिव्हाळा निर्माण होणार आहे.जमाखर्चाचा अहवालाची पुस्तिका दानशुरांच्या नावासह प्रकाशित करण्याचा संकल्प आहे.
या सामूहिक मंगलपरिणय सोहळ्यास हजर राहण्याचे आव्हान करताना दादासाहेब म्हणाले की आज मी वेळातवेळ काढुण मुंबईहुन येऊन नियोजन कामासाठी थोडासा वेळ दिला.तुम्ही सर्वजन १२मे रोजी ऊपासक ऊपासिकांना सदिच्छा देण्यासाठी आवर्जुन ऊपस्थित रहावुन साक्षिदार व्हा!ते लवकरच ह्या प्रवासावर भरपुर लिहिणार आहेत
कोण आहेत दादासाहेब यादव –
घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगर या आंबेडकरी चळवळीतील बाल्लेकिल्यातील एक लढाऊ सामाजिक कार्यकर्ते,पुणे मावळ तालुक्यात मूळ गाव असणारे दादासाहेब मावळ आणि मुंबई परिसरात आंबेडकरी चळवळीतील एक उत्साहित आणि कृतिशील व्यक्तिमत्व, समस्त बौद्धजन ही संकल्पना राबून समस्त पुणे आणि मुंबईतील तरुणांना दिशा देण्यासाठी महत्त्वाचे कार्यकरत आहेत आणि जनहीत चॅरीटेबल ट्रस्ट चे प्रमुख सल्लागार ही आहेत.
प्रमोद रामचंद्र जाधव
संपादक
www.ambedkaree.com
प्रमोदजी आपले तसेच आंबेडकरी डाॅट काॅमचे खुप खुप आभारी आहोत.धन्यवाद!
धन्यवाद दादासाहेब आपले सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचले पाहिजे