भारिप आणि एमआयएमची राजकीय युती, नव्या राजकीय इतिहासाची सुरुवात…!

भारिप आणि एमआयएमची राजकीय युती…….!
नव्या राजकीय इतिहासाची सुरुवात …….!

 “अड प्रकाश आंबेडकर करतील युतीचे नेतृत्व.”

भारिप बहुजन महासंघ आणि एम आय एम या दोन पक्षांची आगामी निवडणूकांसाठी महाराष्ट्रात युती झाली असून एक वेगळ्या राजकीय समीकरणाचा पर्याय तयार झाला आहे .

महाराष्ट्रात अड प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी हातमिळवणी केल्याने राज्यात इतर पक्षांसमोर एक नवं राजकीय आव्हान उभं राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
या युतीतील दोन्ही पक्षांनी दलित-मुस्लिम ऐक्याची हाक दिली आहे. याची सुरुवात औरंगाबादमध्ये २ ऑक्टोबरला दोन्ही पक्ष एकत्र सभा घेऊन करणार आहेत असे सूत्रांकडून समजते .

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षांनी युती केली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आतापर्यंत दलित आणि मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर करण्यात आल्याचं सांगताना २ ऑक्टोबरला राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्ष राज्यात एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
युतीचा पहिला प्रयोग अहमदनगर महापालिकेत केला जाणार आहे.या नव्या आणि क्रांतिकारी युतीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आद अड प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असणार आहे. दोन्ही पक्ष महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत.असे सूत्रांकडून समजलें.

Next Post

नव्या भारिप-एम आय एम च्या युतीने काँग्रेसवाल्यांची गोची ........!

रवि सप्टेंबर 16 , 2018
काँग्रेसवाल्यांची गोची ……..! सतत निवडणुकीत बौद्ध, दलित आणि मुस्लिम पक्षाच्या नेत्यांना हिंदुत्व वादयांची भीती दाखवून असमान राजकारण खेळणाऱ्या काँग्रेसला अड आंबेडकर यांनी एम आय एम युती करण्याची घाई केली असे वाटते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मत मांडले . […]

YOU MAY LIKE ..