भगवा बुध्दो
हल्ली आंबेडकराईट बौध्दांमध्ये काही प्रबोधन करणारी मंडळींकडून एक प्रचार पहावयास, ऐकावयास, वाचावयास मिळतो. तो म्हणजे बुध्दांना ‘भगवान बुध्द’ असे म्हणू नये. भगवान हा शब्द बुध्दांसाठी वापरणे चुकीचा आहे.
तो चुकीचा कसा यासाठी ते अनेक तर्कसंगत नसलेले दाखलेही देतात.
त्यापैकी काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न आपण पाहू.
१. Budda and His Dhamma या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म कसा ?
२. बाबासाहेबांनी बुध्दाला भगवान असे कुठे म्हटले आहे ?
४. पालि त्रिपिटकात भगवा हा शब्द ब्राम्हणातून आलेल्या बौध्द भिक्खूकडून त्रिपिटकात घुसडवला आहे. गाथा वंदना ह्या नंतरच्या काळातील आहेत.
असे प्रश्न निर्माण करून संभ्रम निर्माण केला जातो.
३. पालि शब्दकोषात ‘भग’ या शब्दाचा अर्थ स्त्री, योनी असा होतो तर ‘वान’ या शब्दाचा अर्थ तृष्णा असा होतो ?
३. पालि शब्दकोषात ‘भग’ या शब्दाचा अर्थ स्त्री, योनी असा होतो तर ‘वान’ या शब्दाचा अर्थ तृष्णा असा होतो ?
यांच्या १ल्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर Buddha and His Dhamma या ग्रंथात आपणाला ठिकठिकाणी ‘Lord Buddha’ असे संबोधलेले दिसून येते. परंतु मूळ इंग्रजी ग्रंथ न वाचता लोक ग्रंथाच्या Title वरचं अडकून पडलेले दिसतात.
यांच्या दुसऱ्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर बाबासाहेबांनी लेखन व भाषणे खंड १८ मधील ३ऱ्या भागात अनेक भाषणात बुध्दाला ‘भगवान बुध्द’ असे संबोधलेले दिसते.
यांच्या तिसऱ्या प्रश्नाबाबत ही लोक पालि शब्दकोष समोर ठेवतात व भगवान या शब्दाची फोड करून भग + वान
भग – स्त्री, योनी
वान – तृष्णा
असा सरळसरळ अर्थ घेतात.
परंतु पालित ‘भग’ या शब्दाचा अर्थ ‘भाग्य’ सुध्दा होतो. पालित सहा प्रकारचे भाग्य आहेत.
इस्सरिय – Supremacy
धम्म – Doctrine, Nature’s truth
यस – Success
सिरि – Glory
काम – pleasure
पयत्त – Purified
मुळात ‘भगवान’ असा पालि शब्द नाही त्यामुळे तो पालि शब्दकोषात भग + वान असा शोधू नये. तो शब्द ‘भगवन्तु’ असा असून त्याचाच ‘भगवा’ होतो.
भगवन्तु = भाग्यवंत
भग हा ‘धातू’ असून वन्तु हा ‘प्रत्यय’ आहे.
भग
भग + वन्तु = भगवन्तु
पठमा विभत्ति एकवचन = भगवा
भगवन्तु
भगवन्तु + सि
न्तु change into आ
भगव + आ
भगवा
कच्चायन व्याकरण
सि यो, अं यो, ना हि, स नं, स्मा हि, स नं, स्मिं सु.
का च पन तायो विभत्तियो? सि, यो इति पठमा, अं, यो इति दुतिया, ना हि इति ततिया, स, नं इति चतुत्थी, स्मा, हि इति पञ्चमी, स, नं इति छट्ठी, स्मिं, सु इति सत्तमी.
मोग्गल्लानब्याकरणं, दुतियो कण्डो स्यादि
न्तुस्स.
सिम्हि न्तुस्स टा होति, गुणवा.
वरील कच्चायन व्याकरण व मोग्गलान व्याकरणातून आपणास कळण्यास मदत होते की भगवन्तु चा भगवा कसा होतो.
आता ह्यांच्या चौथा प्रश्न ‘भगवा’ हा शब्द ब्राम्हणातून आलेल्या बौध्द भिक्खूंकडून त्रिपिटकात घुसडवला गेला आहे हे पाहू. मुळात हे लोक पालि भाषा व त्याच्या वाड़्मयाच्या अभ्यासाकडे कानाडोळा करणारे असतात. इकडे ते कधीच वळत नाहीत अथवा वळलेले नसतात त्यामुळे हा गोंधळ निर्माण होतो. कोणत्या ब्राम्हणातून आलेल्या भिक्खूने भगवा हे शब्द घुसडवले हे लोक सिध्द करू शकतात काय? तीसरी संगिती मोगलीपुत्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली ते ब्राम्हण होते काय? चौथी श्रीलंकेत झाली, पाचवी सहावी ब्रम्हदेशात, तिकडे विद्वान भिक्खू नव्हते काय ? मूळात संगिती कश्याप्रकारे होते आणि बुध्दवचन कशी संरक्षित ठेवली जातात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
भगवान बुध्दांच्या हयातीतच महामंगल सुत्त, करणीय मेत्त सुत्त, पराभव सुत्त इ. गाथांची वंदनांची रचना झाली. या गाथांमध्ये आपल्याला भगवा शब्द सापडतो. त्याचा समावेश त्रिपिटकात आहे.
भगवा कोणाला म्हटले जाते याबाबत पालि वाड़्मयातूनच काही उदाहरणे घेऊ.
भग्गरागो भग्गदोसो, भग्गमोहो अनासवो.
भग्गास्स पापका धम्मा, भगवा तेन वुच्चती”ति..
ज्याने आपला राग, दोष, मोह, आसवं नष्ट केले आहेत.
ज्याने आपले पापधर्म काढून टाकले आहेत, त्यालाच भगवा म्हणतात.
“भगवाति वचनं सेट्ठं, भगवाति वचनमुत्तमं.
गरु गारवयुत्तो सो, भगवा तेन वुच्चती”ति
भगवन्ताचे वचन श्रेष्ठ असतात, भगवन्ताचे वचन उत्तम असतात.
तो गुरू गौरवाने युक्त असतो, त्यालाच भगवा म्हणतात.
भाग्यवा भग्गवा युत्तो, भगेहि च विभत्तवा.
भत्तवा वन्तगमनो, भवेसु भगवा ततो”ति
ते भाग्यवंत आहेत, ते भग्न करणारे आहेत, ते भग ( भाग्य ) युक्त आहेत.
ते सतत उत्पन्न होण्यास नाकारणारे आहेत, म्हणून ते ‘भगवा’ आहेत.
भगी भजी भागी विभत्तवा इति,
अकासि भग्गन्ति गरूति भाग्यवा.
बहूहि ञायेहि सुभावितत्तनो,
भवन्तगो सो भगवाति वुच्चती”ति..
भाग्यवंत, सोबत असणारा, भागी, विभक्त करणारा, ज्याने भग्न केले आहे, तोच गुरू ‘भगवा’ आहे.
ज्याने स्वतला अनेक मार्गाने संपूर्ण केले आहे, जो निर्वाणापर्यंत पोहचला त्याला ‘भगवा’ म्हणावे.
[BLESSED]
- Blessed (bhagavant) is a term signifying the respect and veneration accorded
to him as the highest of all beings and distinguished by his special qualities.21
Hence the Ancients said:
“Blessed” is the best of words,
“Blessed” is the finest word;
Deserving awe and veneration,
Blessed is the name therefore.
- Visuddhimagga.
टिप :- सदर लेख कोणा एका व्यक्तीला उद्देशून द्वेषाने लिहिलेला नसून ज्यांना ज्यांना ‘भगवान’ या शब्दाबद्दल आक्षेप आहे अश्यांसाठी माहीतीपर लिहिला आहे.
- अरविंद भंडारे
पालि रिसर्च इन्स्टिट्यूट