ज वि पवार .…….!
आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी तेजस्वी अन स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व….!
माझ्या शालेय अभ्यासक्रमात दहावीच्या मराठी पुस्तकात तील ती कविता-
तू झालास मुकसमाजाचा नायक.…….!
कधी स्वप्नातही त्या वेळी वाटले नव्हते की या कवितेच्या कवींना मी भेटेन ….! ज्या दिवशी ही कविता माझ्या शिक्षकांनी शिकविली त्याच वेळी मी या कवींना माझे गुंरु म्हणून …..!मनोमन स्वीकारले ….पुढे त्यांची बळीदान ही कादंबरी वाचनात आली आणि चळवळ म्हणजे काय आणि कशी…..यावर विचार करू लागलो. गावी शिक्षण झाल्याने कोकणातून मुंबईत शिक्षण आणि नोकरी करीत मुंबई आलो त्या बाप्टी रोड कामाठीपुरा च्या १ ल्या लेनच्या सिद्धार्थ नगरात बहुसंख्य कोकण्याची वस्ती आणि हेच सिद्धार्थ नगर दलित पँथरच्या जन्म स्थान होते …आलो तेव्हा ज वि ना शोधत होतो . एवढा मोठे लेखक त्याना भेटणार कसे ….? दिवस जात होते मीही चळवळीचा अन माझा अभ्यास करीत होतो सिद्धार्थ नगरात मित्रांसोबत सामाजिक कामात पुढे येत होतो आणि नंतर मी कल्याणला आल्यावर www ambedkaree.com ची निर्मिती केल्यावर त्यानंतर माझा मित्र संदीप जाधव कोतापकर याने जवळ सहज एका विषय वर चर्चा करताना तो जा विचा भाचा असल्याचे म्हणाला त्यानंतर त्याने भेट घडवली आणि त्यांना मी ची ज भांबेडकर (कोकणातील आंबेडकरी चळवळ विशेषतः लांजा राजापूर या तालुक्यात त्यांनी काम केले होते ,धर्मांतराची चळवळ त्यांनी कोकणात राबवली ) यांचा नातू व करत असलेल्या www. ambedkaree.com ची संकल्पना सांगितल्यावर ते मार्गदर्शक म्हणून उभे राहिले तिथून जा वि चा सहवास ….दोघांमध्ये एक दुवा म्हणजे ते ही सिद्धार्थ नगरचे रहिवाशी आणि मीही त्यामुळे नवं नाते जुळले ..एक उत्तम मार्गदर्शक,उत्तम स्पष्टपणया आणि सडेतोड विचार यावर ते ठाम आणि दोघांना जोडणारा दुवा म्हणजे …….महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर …..ते एकदा म्हणाले प्रमोद तुला माहीत आहे का ……मी बरेच लिखाण केले य पण त्याची पहिल्या ओळीची सुरुवात मी बाबासाहेबांच्या नावानेच करतो मग ते लिखाण वयक्तिक ,सामाजिक,राजकीय असले तरीही ……..बाबसाहेबांबद्दल उच्चप्रतीचा आदर सन्मान मी या लढवय्या नेत्या कडून शिकलो….!
त्यांचे साहित्य वेबमिडियात आणायचे काम मी अजून ही पूर्ण करु शकलो नाही पण लवकरच त्यांच्या नावाची वेबसाईट तयार करून त्यांना समर्पित करणार आहे …..!
एक लढाऊ नेता ,मार्गदर्शन आणि साहित्यातील प्रसिद्ध लेखक म्हणून ज वि मोठे आहेतच पण ते चांगले मित्र ही आहेत…!त्यांची मैत्री ही वय ,काल, अनुभव,मोठा लहान म्हणून नसते तर ते विचारावर मैत्री करतात ……!
म्हणूच की काय ते सुर्यपूत्र भैयासाहेब आंबेडकर आणि आता आद बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत .आज त्यांचा वाढदिवस त्याना त्यानिमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा त्यांची पुढील वाटचाल अधिकाधिक प्रेरणादायी होऊंदे हीच www. ambedkaree. com परिवाराकडून हार्दिक सदिच्छा…!
-प्रमोद रामचंद्र जाधव
www. ambedkaree. com