महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प

महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प

 

आज भारतात सर्पमित्र / सर्प अभ्यासक असे सांगतात की भारतात चारच सर्प असे आहेत की ते फार विषारी आहेत./

यासंबंधीचा उपदेश २५०० वर्षापूर्वी भगवान बुध्दांनी भिक्षूंना महापरित्राण पाठातील खन्ध सुत्तं मध्ये दिला आहे. 

एकदा भगवान बुध्द श्रावस्तीला अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करित होते. त्यावेळी श्रावस्तीच्या एका भिक्षूला सर्पदंश झाल्याने तो मृत्यू पावला. तेव्हा काही भिक्षूंनी भगवंतास सर्पदंशांने भिक्षू मृत्यू पावल्याचे कथन केले. तेव्हा भगवंतांनी ह्या विषारी सर्पांपासून दंश होउ नये तसेच त्या सर्पांत व प्राणिमात्रात मैत्री करूणा वाढीस लागून कोणाचीही हानी होऊ नये याकरिता भिक्षूंना पुढील उपदेश केला. 

 

सब्बासीविसजातीनं, दिब्बमन्तागदं विय ।

यं नासेति विसं घोरं, सेसञ्चापि परिस्सयं ।।

आणाक्खेत्तम्हि सब्बत्थ, सब्बदा सब्बपाणिनं ।

सब्बसोपि निवारेति, परित्तं तं भणाम हे ।

 

“विरुपक्खेहि” मे मेत्तं, मेत्तं “एरापथेहि” मे ।

“छब्यापुत्तेहि”मे मेत्तं, मेत्तं “कण्हागोतमकेहि” च ।।१।।

 

अपादकेहि मे मेत्तं, मेत्तं द्विपादकेहि मे ।

चतुप्पदेहि मे मेत्तं, मेत्तं बहुप्पदेहि मे ।।२।।

 

मा मं अपादको हिंसि, मा मं हिंसि द्विपादको ।

मा मं चतुप्पदो हिंसि, मा मं हिसि बहुप्पदो ।।३।।

 

सब्बे सत्ता सब्बे पाणा, सब्बे भूता च केवला ।

सब्बे भद्रानि पस्सन्तु, मा किञ्चि पाप’मागमा ।।४।।

 

अप्पमाणो बुद्धो, अप्पमाणो धम्मो ।

अप्पमाणो संघो, पमाणवन्तानि सरीसपानि ।।५।।

 

अहि विच्छिका सतपदी, उण्णनाभी सरबू मूसिका ।

कता मे रक्खा, कतं मे परित्तं ।।६।।

 

पटिक्कमन्तु भूतानि, सो’हं नमो भगवतो ।

नमो सत्तन्नं सम्मासम्बुद्धानं ।।७।।

 

(खन्ध सुत्तं निट्ठितं)

 

https://en.m.wikipedia.org/wiki/Big_Four_(Indian_snakes)

 

पालि भाषेत उल्लेखिलेल्या सर्पांचे मराठी इंग्रजीत नाव 

 

१. “विरूपक्ख”  – घोणस – Russell Viper

२. “एरापथ” – मन्यार – Common Krait

३. “छब्यापूत्तो”- फुरसे – Saw Scaled Viper 

४. “कण्हगोतमो” – काळा नाग – Black Cobra

(नोट – पावसाळ्यात अनेक ठिकाणी सर्प घरात, इमारतीत, शेतात, गोठ्यात कुठेहि शिरतात. सर्पांविषयी बरेच गैरसमज अजूनहि प्रचलित असल्यामुळे त्यांची हत्या केली जाते. परंतु तथागतांनी २५००  वर्षापूर्वी सर्पांबद्दल मैत्री करूणा दाखविल्याचे व भारतात त्याकाळात देखील हेच सर्प विषारी समजले जात होते याचे उदाहरण आहे. दिलेल्या लिंक वर भेट द्या).

 

– अरविंद भंडारे 

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट 

Next Post

खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न.

रवि जून 24 , 2018
खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले नंतर धम्म प्रचारार्थ 45 वर्षे चारिका केली. आता सामान्य धम्म उपासकाना चारिका म्हणजे काय? हे सांगणे आवश्यक आहे. यात्रा करणे, प्रवेश करणे. तथागत बौद्ध भिक्षूंना विनय […]

YOU MAY LIKE ..