भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा!
भारतीय समाज जीवनात उच्च कोटीच्या नैतिकतेवर आधारलेल्या समाज मुल्याच्या वृध्दीस कारणीभूत ठरणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव अथवा सन्मान करणे सबंध भारतीयांचे अद्य कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये. भारतीय संविधान हे भारतीय कायदा आहे. आणि हा भारतीय कायदा आम्हा सर्व भारतीयांना मिळालेली सर्वात मोठी देणगी संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे.
संविधानाची सुरवातच ‘‘आम्ही भारताचे लोक…’’ अशी सुरुवात करून संविधान निर्मात्यांनी भारतीय जनतेला केंद्रस्थानी मानले आहे. या देशाचा राज्यकारभार कोणा एका समूहाच्या हाती नसून, सर्व भारतीय जनतेच्या हातात आहे, असे आधोरेखित केले आहे. म्हणजे पाच वर्ष देशाचा कारभार चालविण्यासाठी जनतेतून निवडून दिलेले सरकार चालवते. जर का हे सरकार संविधनाने आखून दिलेल्या चैकटीनुसार चालवत नसेल तर, पाच वर्शानंतर दुसरे सरकार निवडून देण्याचा सर्वात महत्वाचा अधिकार प्रौढ मतदानाच्या रूपाने संविधानामुळे प्राप्त झालेला आहे, हे विसरून चालणार नाही. भारतीय नागरीकांना, संविधानामुळे मिळालेल्या मतदानाचा अमुल्य अधिकाराचा योग्य वापार करताना दिसत नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. निवडणुकीमध्ये मत सरासपणे विकले जात आहे असे निदर्षनास येते. म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या पर्यायाने देशा च्या हिताकरिता मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला आहे. याचा आपणाला विसर पडतो आहे की काय? असा प्रष्न पडतो. ज्या देशात मतदार विकाऊ असेल, त्या देशाची लोकशाही धोक्यात आहे असे समजून घ्यावे.
संविधान प्रेमी लोकांना आवाहन आहे की, संविधानाचा गौरव वा सन्मान करावयाचा असेल तर आपण निवडणूकीत आपले मत विकणार नाही अशी ‘भीमप्रतिज्ञा’ घ्यावी लागेल आणि हाच संविधानाचा गौरव ठरेल!
संविधानाचा गौरव करणे म्हणजे काय ? तर संविधानाने दिलेल्या तत्त्वानुसार देशाचा कारभार चालवणे होय, संविधानाचा सन्मान करणे म्हणजे काय. तर संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक भारतीय नागरीकांचे आचरण होय. हे ध्यानात घ्यावे. संविधानाप्रती सर्वांनी जागरूक असणे हे जीवंतपणाचे लक्षण होय.
संविधान हे भारतीय जनतेच्या आचार आणि विचारामध्ये तंतोतंत रूजेल तेव्हा खऱ्या अर्थाने संविधानाचा गौरव होईल! भारतीय मनात चिरकाल टिकणारे संविधानाचे नितिमुल्य निर्माण होईल, तेव्हा तो दिवस सोनियाचा दिवस असेल. मानवी मुल्याच्या वृध्दीचा असेल!
आणखी एका गोष्ट आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे, तो म्हणजे भारतीय लोकशाही शासनव्यवस्था संविधानाच्या तत्वानुसार चालते का? तर याचे उत्तर नाही असे असे दिले तर ती अतिष्योक्ती होणाार नाही.
संसदीय लोकशाही शासनव्यवस्थेत प्रौढ मतदानाला अतिशय महत्व आहे. मतदान हे भयमुक्त वातावरणात झाले पाहिजे हे संविधानाला अपेक्षीत आहे. परंतु या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका राजकीय पक्षाच्या दबावाविरहित होत नाहीत. हे आतापर्यतच्या निवडणुकीच्या काळात निदर्षनास आलेले आहे. म्हणजे इथल्या मतदाराच्या सुरक्षेची हमी ना सरकार देते ना प्रषासन देते. लोकशाहीच्या दृश्टीने ही बाब गंभीर आहे. 2019 मध्ये होणऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदारांनी कोणत्याही अमिशाला बळी न पडता डोळ्यासमोर ‘संविधान’ ठेवून निर्भयपणे मतदान कराल, तर हा भारतीय संविधानाचा गौरव/सन्मान ठरेल. अन्यथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाप्रती आपण बेईमान ठरू.
देशातील सध्याची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थिती डोळ्या समोर ठेवून, देषाच्या एकात्मेला, अखंडतेला होणाऱ्या संभाव्य धोका ध्यात घेता आपण सर्व भारताचे लोक वेळीच सावध होवून, भारतीय लोकशाही व संविधानाप्रती जागृत होवून, संविधानाचा गौरव व सन्मान वाढवला पाहिजे. आणि म्हणून त्याकरिता आपण सर्व भारतीय लोक एकत्र आले पाहिजे. संविधान जनजागृती अभियान राबवूने काळाची गरज आहे.
लेखक साप्ताहिक ‘‘प्रबुध्द नेता’’ चे संपादक आहेत.