“आमचा फक्त वापर केलाय”…..!
इथल्या प्रस्थापित राजकीय पक्ष्यांची भटक्या विमुक्त जमाती,वंजारी,धनगर, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती अडीच फक्त वापर धर्मनिरपेक्ष वादी राजकीय पक्ष,संघटना यांनी केलाय असा दृढ विश्वास वाटतो आहे त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यात आल्या नाहीत.
या समाजातील तरुणांमध्ये आम्ही “सोशल फोर्स” म्हणून उभे राहू, स्वताची ताकद निर्माण करु व इथल्या सत्तेमध्ये सहभागी होऊ अशी भावना निर्माण झालीय.
नुकत्याच झालेल्या भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासंदर्भात व आपली राजकीयदृष्ट्या भूमिका यावर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या समाज्यातील तरुणांच्या या भूमिकेचं स्वागत करतो वआमचा त्यांच्या भूमिकेला पाठींबा आहे व त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. अशी भूमिका अड प्रकाश आंबेडकर यांनी मांडली . यावेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने, विवेक मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आमच्या न्याय हक्काचा लढा आम्हालाच लढावा लागेल. पुण्यात 9 जून रोजी होणारी परिषद त्याची नांदी आहे. 20 मे रोजी धनगर समाजाचा पंढरपूर येथे होणारा “सत्ता संपादन निर्धार मेळावा” हा देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल. 9 जून रोजी होणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या परिषदेस आमचा पाठींबा आहे. या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहवे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी लक्ष्मण माने म्हणाले की, इथुन पुढे आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांच्या दारात भीक मागण्यासाठी जाणार नाहीत. सन्मानाने जे आम्हाला वागवतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. मदतीसाठी आम्ही झोळी घेऊन हिंडणार नाही. अशी भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहोत. आम्ही सर्व एकत्र आल्यावर निश्चितच आमचे प्रश्न आम्ही सोडवू, असे प्रतिपादन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी केले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाने उपस्थित रहावे असे आवाहन ही त्यांनी केले.
महाराष्ट्राची वाटचाल अकोला पॅटर्नच्या दिशेने
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेला अकोला पॅटर्नच्या दिशेने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल होतांना दिसत आहे. सत्तेमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व देण्याचा अकोला पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला आहे. यामध्ये अल्पसंख्यांक, आदिवासी, भटके विमुक्त, अलुतेदार-बलुतेदार, महिला आदिंना सत्तेमध्ये सहभाग मिळाला आहे. राज्यातील अनेक वंचित समूह ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आपल्या न्यायासाठी लढा देताय. त्यामुळे “महाराष्ट्राची वाटचाल अकोला पॅटर्नच्या दिशेने” होत आहे असं चित्र निर्माण होतांना दिसत आहे.