मोठमोठ्या शब्दांचे इमले नाही तर कृतीतून नंदनवन तयार होते.
महामानव डाॅॅ बासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या सुपीक जमिनीवर खुशाल मजा करा पण त्यांनी जे झाड खडकावर लावले आहे त्याचे संगोपन आधी करा.
त्यांनी जेव्हा बौद्ध लेणी वर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते तेव्हा अनेकांनी प्रशंसा केली पण जेव्हा तिकडे कृतिशील कार्य करायचे तेव्हा फक्त ते चार जणच होते.
या गोष्टीची जाणीव आहे की आपला समाज नाच गाणी आणि देखाव्यात धन्यता मानतो. त्यामुळे अशी अपेक्षा देखील त्यांनी कुणांकडुन केलेली नाही. बहुदा हाच विचार ते करत होते आज चार आलेत उद्या चाळीस येतील.
दडपलेल्या संस्कृृतीकडे समाजाचेच दुर्लक्ष…..!
हो प्रज्योत कदम ,रविंद्र मिनाक्षी मनौहर,मुकेश जाधव आणि अनिल जाधव या तरूणांनी केल्या आव्हाणां संदर्भात प्रज्यौत कदम बोलत होते . हे तरुण बौध्द लेण्यांवर संशोधनात्मक मोहिमा राबवित आहेत त्याचाच हा भाग होता हजारोवर्षांपासुन हा भ.बुध्दाचा, सम्राट अशोकाचा वारसा व इतिहास दडपला गेला तथाकथित संस्कृृती रक्षकांनी खोटा इतिहास रचुन खर्या इतिहासाला दडपले पण सत्य बाहेर येत आहे सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या भग्न अवस्थेत असणार्या लेण्या आता सापडत आहेत त्यावर लिहिलेला इतिहास आता वाचता येतोय . स्वताला बौध्द म्हणणार्या प्रत्येक व्यक्तीन हा वारसा जपण्यासाठी पुढे आले पाहिजे.
—प्रमोद रामचंद्र जाधव
खूप चांगले धम्म कार्य सर्व माझ्या बांधवांनो
A eye opener post. Though i wasn’t aware due to my agyan from here onwards i will transform this thoughts to others mind. I may not be available due to my personal commitments but i will see myself at Buddhist caves whenever i get a chance.Thanks for awakening. Sab ka mangal ho. Jai Bhim.