“आंबेडकरी संग्राम” चे स्वाक्षरी अभियान

AMBEDKAREE SANGRAM

■ सोमवार 6 डिसेंबर 2021
सकाळी 11 वाजता
■ स्थळ: चैत्यभूमी ( दादर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रारंभी), दादर ( पश्चिम ) मुंबई.

आपणांस कल्पना आहेच की, नागपूरच्या रुग्णालयासाठी वळवण्यात आलेले दलित विकास निधीतील 875 कोटी रुपये परत मिळण्यासाठी आंबेडकरी संग्रामने जंग छेडले आहे. तो निधी परत मिळवण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी सोमवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चैत्यभूमीवर स्वाक्षरी अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. नंतर हे अभियान राज्यभरात वस्ती- वस्तीत पोहोचणार आहे.

या अभियानासाठी दादर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोरच वेळेआधी येऊन आपणा सर्वांना एकत्र जमायचे आहे. आंबेडकरी संग्रामच्या या अभियानाचे राज्यभरातून स्वागत झाले असून त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. त्यातून उभा राहणारा जनमताचा मोठा रेटा राज्य सरकारला अन्यायकारक निर्णय बदलायला हमखास भाग पाडेल, याविषयी आमच्या मनात तीळमात्र शंका नाही.

सुना सुना महापरिनिर्वाण दिन

दिल्लीत संसदेचे आणि राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन असल्याची नेमकी वेळ कोरोनाच्या नव्या ‘ओमीक्रोन’ या अवताराने महापरिनिर्वाण दिनाच्या तोंडावर बरोब्बर साधली आहे! त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी जनतेवर गर्दी होऊ न देण्याच्या नावाखाली सरकारने चैत्यभूमी येथे खुबीने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे खास ग्रंथांसाठीच ‘राजगृह’ बांधणाऱ्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन पुस्तकांच्या स्टॉल्सअभावी यंदा सुना सुना ठरणार आहे.

बळ समुच्चयात नव्हे, निश्चयात!

अशा परिस्थितीत स्टॉल आणि आवश्यक साधन सामग्री मांडण्याला मज्जाव करण्यात आल्याने आपल्या स्वाक्षरी अभियानाची गैरसोय होऊ शकते. आपली तारांबळ उडू शकते. पण बळ हे समुच्चयात नव्हे तर निश्चयात असते, हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आधीच सांगून ठेवले आहे. चैत्यभूमीवरील स्वाक्षरी अभियानात मास्क लावून पुरेपूर खबरदारी घेत शांततेने आणि निर्धाराने आपली मागणी आपल्याला धसास लावायची आहे. त्यात आपणा सर्वांची एकदिलाने साथ आणि सहकार्याची नितांत गरज आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात यापूर्वी घेतलेल्या बैठकीनंतर आम्ही मंथन- चिंतनातून आंबेडकरी चळवळीसाठी एक अजेंडा तयार केला आहे. स्वाक्षरी अभियानावेळीच तो अजेंडा चैत्यभूमीवर जनतेच्या हाती देण्यात येणार आहे. राज्यभरात पोहोचवला होणार आहे. या कार्याला सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य अपेक्षित आहे.

आपले विनीत

● प्रा डॉ जी के डोंगरगावकर शिक्षणतज्ञ

● दिवाकर शेजवळ ज्येष्ठ पत्रकार

● सतीश डोंगरे बँक कर्मचारी नेते

● सयाजी वाघमारे ज्येष्ठ पँथर नेते

● सुनील कदम राजकीय विश्लेषक

● प्राचार्य रमेश जाधव

● कुलदीप रामटेके माजी अध्यक्ष बानाई

● प्रा एकनाथ जाधव

● सुभाष डोंगरे अध्यक्ष, भारतीय वनाधिकारी महासंघ, नवी दिल्ली.

● पंजाबराव बडगे सरचिटणीस, ऑल इंडिया सेन्ट्रल बँक बहुजन समाज एम्प्लॉईज युनियन

● शरद कांबळे उप महासचिव, फोरम ऑफ एस सी/ एस टी बँक एम्प्लॉईज असोसिएशन्स.

● प्रा शाहू ओव्हाळ ● प्रा संतोष खरे

● अशोकराव कांबळे ● रमेश मोकळ

● गौतम सोनावणे ● चंद्रसेन कांबळे

● प्रा मच्छिंद्र तिगोटे ● प्रा अलका सूर्यवंशी

●ऍड सिद्धांत सरवदे ● ऍड प्रज्ञेश सोनावणे

● ऍड अमित कटारनवरे ● सुरेंद्र सरतापे

● सीताराम लव्हांडे ● सुनील शेजवळ

● भीमराव चिलगावकर ● कबीर दया हिवराळे

● जोसेफ बरेटो ● रियाज कुट्टी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Next Post

सहमत असाल तर तुम्ही फक्त एवढे कराच!

शुक्र डिसेंबर 17 , 2021
●●●●●●●●●●●● महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंम्बरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आंबेडकरी संग्रामने मुख्यमंत्री मान. उद्धव ठाकरे यांना पाठवलेले हे निवेदन. अनुसूचित जातींसाठीच्या राखीव मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदारांची संख्या २९ इतकी आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाला पत्र पाठवण्यात आले आहे. दलितांच्या संविधानिक […]

YOU MAY LIKE ..