लोकसत्ता च्या आजच्या मुलाखतील बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे –
1) बाबासाहेबांनी आदिवासींना
जल-जंगल-जमीन चा अधिकार व मालकी हक्क दिला
तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडून तो तुम्हाला घ्यावा लागेल
परंतु तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करत आहात
आदिवासी त्याला विरोध करतोय
तर तुम्ही सलवा जुडूम चालवता
व या देशाचा बुध्दजिवी मुग गिळुन बसला आहे
सुप्रीम कोर्ट सुध्दा सलवा जुडूम ला मान्यता देते हि खंत आहे.
2) राजकारणातून जात धर्म हद्दपार होणारच नाही, कारण काँग्रेस ,भाजप, राष्ट्रवादी , शिवसेना हा क्लास धर्म आणि जात दोन्ही मानतो.
ज्यांना वाटतं की देशाची उभारणी जात आणि धर्माच्या विरहित झाली पाहिजेत त्यांनी अशा विचारसरणीच्या लोकांना बायकॉट जोपर्यंतकरत नाही तोपर्यंत जाती-धर्माचं राजकारण हे संपणार नाही.
3)एक आंबेडकर पचवता आला नाही तर हा दुसरा आंबेडकर उभा झाला व त्याच रस्त्याने गेला तर पचवायचा कसा म्हणून सर्व स्वयंघोषित पुरोगामी माझ्याविरूध्द एकत्र येतात व धर्मवाद्यांसोबत जातात..!
4)राजकारणातला शिळेपणा घालवून ताजेपणा आणण्यासाठी मी नवीन पिढी कडून आशावादी..
5)मी एक पुस्तक लिहल आणी कारखानदार कशे चोर आहे सांगितलं तर 87 साखर कारखान्यांनी माझ्याविरोधात तक्रारी दाखल केल्या.
6)मोदी च्या मर्डर मध्ये मला फसविन्याचा प्रयत्न झाला,
मी म्हणतो, “मला फक्त पकडून दाखवा मग युध्द कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवतो”
7)कोकण हे सर्वात मोठ ऑक्सिजन सेंटर आहे. तिथे रासायनिक कारखाने आणण्याचा निर्णय चुकीचा.
8)८०% घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला
Select to Education चा अधिकार असला पाहिजे..
9)धर्म आणी जात
याने देशाला ओवरटेक केलं आहे.
10)माझी व संभाजी राजेंची भेट झाल्यानंतर
महाराष्ट्रात वाकड्या-तिकड्या भेटी व्हायला शुरूवात झाली आहे.
11)महाराष्ट्राचा सध्याचा सत्ताधारी मराठा
हा निजामाशी संबंधित आहे.
12)मी जात मानत नाही, अमुक मानत नाही, तमुक मानत नाही, असं जर कोणी म्हणत असेल, तर तो नाटक करतोय
असे मी मानतो