भीम के लखते जिगर, आधे इधर आधे उधर या गाण्यावर नाचणे बंद होईल का?

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती काल देशभरात विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात साजरी झाली.हल्ली हल्ली राज्यपाल, शासनाचे मंत्री, महापौर चैत्यभूमीला तर मुख्यमंत्री दिक्षाभूमीला वंदन करण्यासाठी जाऊ लागले आहेत.
काल काही अपवाद वगळता जिकडेतिकडे या जयंतीला उत्साहाचे स्वरूप आलेले दिसले.

बाबासाहेबांच्या विचारानुसार आज या देशाने आणि समाजाने किती वाटचाल केली याचे चिंतन करण्याचा खरे तर हा दिवस! परंतु याचे ना शासनाला गांभीर्य आहे ना समाजधुरीणांना ! उलट बाबासाहेबांच्या विचारांचे विकृतीकरण जास्तीत जास्त प्रमाणात कसे करता येईल याचीच अतोनात काळजी शासनस्तरावरून आणि समाजातील बांडगुळांकडून घेतली गेली.
बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थकारणाबाबतचे मांडलेले विचार, त्यांनी आखलेले जलसिंचन धोरण, केंद्रियकृत राज्यघटना, हिंदु कोड बिल, कामगार कायदे किती दुरदृष्टीचे वा भविष्याचा विचार करणारे होते. यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे.
पण सध्याच्या आंबेडकर जयंतीला डीजे, रोषणाही यांचे अतोनात पीक आलेले आहे. हे करूच नये असे नाही ; पण यात बाबासाहेबांचा विचार कुठे हरवणार नाही याची तर काळजी घेतली पाहिजे.

*भीम के लखते जिगर, आधे इधर आधे उधर* या गीतातील आशय लक्षात न घेता डिजेवर बेभान होऊन नाचताना आपल्याला कशाचीच लाज वाटत नाही.

त्या गाण्याचा अर्थ तर समजून घ्या.अशी अतिशय केविलवाणी आपली परिस्थिती आहे.
समाजात दलालांची संख्या भरमसाठ वाढली आहे. बोली लावायला तर काही सदैव तयारच असतात.निष्ठा बदलण्यात आपला हात कुणी पकडू शकणार नाही, एवढे आपण क्वालिफाईड झालेलो आहोत. काय होईल समाजाचे आणि राष्ट्राचे? अत्यंत जीवघेणे प्रश्न समोर असतांनाही आपण कसे शांत शांत आहोत! वामनदादा म्हणतात त्याप्रमाणे *मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, सांगा दोष देऊ कुणा ?* हेच खरे आहे. अनेक बाबतीत आज आपण सपशेल नापास ठरलेलो आहोत. या देशात यादवी माजते की काय अशी भयंकर स्थिती भाजपाने आज करून ठेवलेली आहे. काहींना तेच अपेक्षित आहे. माणूस नि समाज एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत.आणि आपले अहंकार इतके टोकदार झालेले आहेत की आपण एकत्र यायला तयार नाही. ऐक्य करायला तयार नाही.
आज आरक्षण, अक्ट्रॉसिटी, बेरोगारी, जागतिकीकरण,जातीय अहंकार, शिक्षणक्षेत्रातील धुडगूस असे अनेक मुद्दे आपल्यासमोर उभे आहेत.
परंतु याचं गांभीर्य अजूनही आमच्या लेखी कुठेच दिसत नाही. एकूणच परिस्थिती मन सुन्न करणारी आहे. भयंकर आहे. याचे लवकरच आम्हाला भान येवो, ही जागृतीच बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल…!
….✍ चंद्रशेखर भारती

Next Post

नवी मुंबई दिघा येथे साजरा झाला महामानवांचा जल्लोषात जयंती सोहळा...!

रवि एप्रिल 15 , 2018
नवी मुंबई दिघा येथे साजरा झाला महामानवांचा जल्लोषात जयंती सोहळा…! शांतीदुत बहुउद्येशिय मागासवर्गिय संस्था यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते विविध उपक्रमातुन महामानवांची जयती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.  स्थानिक नगरसेविका शुभांगी  गवते यांनी  प्रमुख उपस्थिती होती.  सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत […]

YOU MAY LIKE ..