पहा पहा मंजुळा ,हा माझ्या भीमरायचा मळा..! हे अमर गीत शब्दबद्ध करणारे कवि श्रेष्ठ हरेन्द्र जाधव काळाच्या पडद्याआड…!

कोणराखील माझ्याभिमाचा मळा ….!

आंबेडकरी चळवळीत कवी,लेखक,गायक आणि गायिका,शाहीर आणि लोक कलाकार यांना फार महत्त्वाचे स्थान आहे ज्या मोजक्या शाहिर,कवी आणि गायकांनी आपल्या प्रतिभावंत लेखणीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची महान चळवळ गतिमान केली त्या पैकी कवी श्रेष्ठ हरेन्द्र जाधव यांचे नाव आदराने आणि सन्मानाने घेतले जाते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धावर अनेक अजरामर गीत त्यांनी लिहिली आहेत.

पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा,
तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, बाप्पा मोरया रे’आता तरी देवा मला पावशील का,‘माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू’ यासारखी साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, एडस, दारूबंदी या विषयावरील अनेक सामाजिक प्रबोधनात्मक लोकगीतं-भीम गीतं-भक्ती गीतं-पोवाडे ज्यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेली आणि प्रल्हाददादा शिंदे,रोशन सातारकर,अनुराधा पौडवालपासून ते सुरेश वाडकर, आनंद -मिलिंद शिंदे, अजित कडकडे,साधना सरगमपर्यंत सर्वांनी ज्यांची गीत गायली .शिवरायांची पराक्रम कथा,कथा भीमरायाची, कथा गुजरात भूकंपाची, कथा गौतम बुद्धांची, कथा संत कबीराची यासारख्या दहा हजाराहून अधिक रचना ज्यांच्या लेखणीतून अवतरल्या ,ज्येष्ठ श्रेष्ठ कवी हरेंद्र जाधव यांचे दुःखद निधनाची वार्ताने आंबेडकरी चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे.

कालच आंबेडकरी अभ्यासक आणि ऍड जगदीश घोडेराव यांचे करोनामूळे दुःखद निधन झाले तर आज आंबेडकरी जलसा आणि साहित्यात आपली लेखणी अजरामर करणारे कविश्रेष्ठ हरेन्द्र जाधव यांचे अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळ व साहित्य,संगीत चळवळ पोरकी झाली आहे.

शब्दांकन :आयु. राहुल महानंदा सुरेश चव्हाण;प्रमोद जाधव www.ambedkaree.com

Next Post

राजर्षी शाहू महाराजांची महानता..!

गुरू मे 6 , 2021
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च […]

YOU MAY LIKE ..