बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली 129 भीमजयंती.
***********************
-किरण तांबे-www.ambedkaree.com
बदलापूर : विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९.वी जयंती ही कोरोना १९ च्या भयावह परिस्थितीत जयंती घराघरात साजरी करत बदलापूरातील भिमसैनिकांनी एकञ येत जयंतीसाठीचे धम्मदान हे बदलापूरातील नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी काञप मधील ग्रामीण रुग्णालय येथे ” व्हेन्टिलेटर सुविधा ” उपलब्ध व्हावी म्हणून एक भरीव रक्कम ५०,०००/-रु.चा पहिला हफ्ता आज दि.२१/०४/२०२० मुख्यमंञी महोदयांना याबाबतचे निवेदन व धनादेश रक्कम बदलापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सारीपूञ साहेब यांच्या उपस्थितीत बदलापूरचे नगराध्यक्ष अॕड.प्रियेश जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अरुण केदारे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे बदलापूर शहराचे नेते दिलीपशेठ पवार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष आनंद सोनकांबळे सर,युवा कार्यकर्ते राहुल केदारे हे उपस्थित होते.