आज रिपब्लिकन नेते ऍड बी सी कांबळे यांची एकशे एक वी जयंती.या निमिताने…!

आज रिपब्लिकन नेते बी सी कांबळे यांची एकशे एक वी जयंती.या निमिताने…!


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जे काही आघाडीचे अनुयायी बाबासाहेबांच्या जवळचे होते त्यात बी सी कांबळे यांचा अग्रक्रम लागतो मुळात ते एक आंबेडकरी.

विचारवंत ,अनुवादक ,कायदेतज्ज्ञ आणि चरित्रकार व प्रसिध्द राजकारणी म्हणून देशात ओळखले जातात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे)गटाचे नेतृत्व केले . बापू चंद्रसेन कांबळे अर्थात बी सी कांबळे यांचा जन्म १५ जुलै १९१९ झाला.

सामान्यत: बी. सी. कांबळे हे एक भारतीय राजकारणी, लेखक, संपादक, न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक नेते म्हणून ही परिचित .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जे काही आघाडीचे अनुयायी बाबासाहेबांच्या जवळचे होते त्यात बी सी कांबळे यांचा अग्रक्रम लागतो मुळात ते एक आंबेडकरी
विचारवंत ,अनुवादक ,कायदेतज्ज्ञ आणि चरित्रकार व प्रसिध्द राजकारणी म्हणून देशात ओळखले जातात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे)गटाचे नेतृत्व केले .

बापू चंद्रसेन कांबळे अर्थात बी सी कांबळे यांचा जन्म १५ जुलै १९१९ झाला.सामान्यत: बी. सी. कांबळे हे एक भारतीय राजकारणी, लेखक, संपादक, न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते होते .

बापूसाहेब बी सी कांबळे यांची थोडक्यात कारकीर्द

खासदार,लोकसभा(1977–1979)-(1957–1962)
मुंबई विधानसभेचे सदस्य(1952–1957)
जनताचे संपादक(1948–1954)प्रबुद्ध भारतचे संपादक(1956–1958),रिपब्लिकचे संपादक
(1959–1975,)त्यांनी बी. आर. आंबेडकर यांचे “समग्र आंबेडकर चरित्र” (खंड १-२–) यांचे चरित्र लिहिले आहे.

त्यांची वैयक्तिक माहिती
जन्म 15 जुलै 1919 पलूस, तासगाव तालुका, सांगली जिल्हा, महाराष्ट्र,

राजकीय पक्ष आणि कारकीर्द
शेड्युलकास्ट फेडरेशन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे)
वडील
चंद्रसेन कांबळे
निवास
मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण BA, B LOW
बॅचलर ऑफ आर्ट
बॅचलर ऑफ लॉ
पदव्युत्तर शिक्षण
गुरुकुल
तालुका हायस्कूल, कराड
फर्ग्युसन कॉलेज, पुणे
व्यवसाय वकील, राजकारणी, लेखक, समाजसेवक
कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना मदत केली. आंबेडकर यांच्या निधनानंतर (सुमारे पन्नास वर्षे पूर्वी) काही वर्ष कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व केले होते नतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये फुट पडल्यावर त्यांनी स्वतः चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) या नावाने गट काढून ते त्या गटाचे अध्यक्ष राहिले.

त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

असे घडले बापूसाहेब……..!

जुलै १९४६ ला पुण्यात होणार पुणे करार रद्द करावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मागणीसाठी सत्याग्रह सुरू केला कारण 1946 India मध्ये अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्या गेलेल्या भारताच्या कॅबिनेट मिशनने याला नकार दिला. त्याला ‘पुणे सत्याग्रह’ म्हणतात. या सत्याग्रहाच्या पाठिंब्यासाठी, विद्यार्थी बी सी कांबळे यांनी किर्लोस्कर मासिकात या दलित “सत्याग्रहींचा कैफियात” हा लेख लिहिलेला होता.

हा लेख ‘किर्लोस्कर’ या नोव्हेंबर 1946 च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर आंबेडकरांनी स्वत: हा लेख वाचला आणि त्यांना जनता साप्ताहिक संपादक म्हणून नियुक्त केले.
१९ ४८ ते १९५४ पर्यंत त्यांनी जनता चे संपादक म्हणून काम पाहिले पुढे त्यांनी १९५६ ते १९५८ पर्यंत बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत ह्या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले .पुढे त्यांनी रिपब्लिक नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले त्याचे ही संपादक म्हणून ही काम पाहिले.

जनता आणि प्रबुद्ध भारत बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होती .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड प्रभाव असल्याने त्यांनी बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला याच दरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सिद्धार्थ कॉलेज च्या लॉ कॉलेजमध्ये घटनात्मक कायद्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.

पुढे १९५२ ला मुंबई विधान सभेच्या निवडणूक मध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे मुंबईतील एकमेव आमदार म्हणून निवडून आले.त्यावेळी मुंबई विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज आपल्या अभ्यासू जोरावर एकाकी मोठा लढा दिला .आता मात्र त्यांचे कार्य लोक विसरून गेले असे वाटते .

१९५७ ते १९६२ आणि १९७७ ते १९७९ या कालखंडात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते लोकसभेत मुंबई विभागाचे खासदार म्हणून निवडून गेले या कार्यकाळात त्यांनी देशात सुरू झालेली आणीबाणी आणि ४४ व्या भारतीय राज्य घटना दुरुस्ती ला जोरदार विरोध केला भारतीय संसद भवनात रिपब्लिकन पक्षाचे अभ्यासू आणि कायदेतज्ज्ञ खासदार म्हणून त्यांची ओळख होती .


ऍड बी सी कांबळे यांनी लिहिलेल्या पुढील पुस्तकांची यादी:
समग्र आंबेडकर चरित्र (खंड 1-24)अस्पृश्य मूळचे कोण ? आणि ते अस्पृश्य कसे बनले? (Who where shudra ? या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसारवादी विचार (डॉ. आंबेडकर यांचे संसदीय कामकाजावरील शेवटचे विचार)
राजा मिलिंद पन्हं (दयाळू मिलिंदचे प्रश्न)
विधिमंडळ वि. उच्च न्यायालय
44 व्या घटना दुरुस्ती विधेयकावरील विचार
आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेवर डॉ
किंग मिलिंद यांचे प्रश्न
ट्रिपीटक (खंड क्रमांक 1 ते 4)
आंबेडकर म्हणून संसद सदस्य डॉ
डॉ. आंबेडकर यांचे संसदीय कामकाजावरील शेवटचे विचार.


आदी विषयांवर बहुमोल लिखाण केले.आंबेडकरी चळवळीतील अत्यंत हुशार आणि अभ्यासू असणाऱ्या ह्या नेत्याच्या राजकीय भूमिका आंबेडकरी जनतेला पचल्या नाहीत परिणामी कित्येकदा त्यांना रोषाला सामोरे जावे लागले आणि कोकण,सांगली सातारा आदी भागातील लोक बापु साहेबाना अर्थात बी सी कांबळे यांनी जनतेचा पाठिंबा होता .


रिपब्लिकन राजकारण त्यांच्या संदर्भात एक अनोखे कोडे असून ते आंबेडकरी विचारवंत,इतिहासकार यांनी सोडवावेत आणि एक वैचारिक वारसा जपलेला हा नेता सर्वांसमोर यावा अशी अपेक्षा करू.


आपल्या वैचारिक बाबींवर ठाम असणारे हे नेतृत्व अखेर आंबेडकरी चळवळीच्या क्षितिजावर अस्ताकडे झुकून गेले आणि केवळ एक नाममात्र गट म्हणून आज त्यांचे आंबेडकरी चळवळीत काही अनुयायी आहेत .मात्र आज ही बापू साहेब यांनी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली जाते .

-शब्दांकन
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Next Post

मुक्ती कोण पथे ?

बुध जुलै 22 , 2020
मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार […]

YOU MAY LIKE ..