WWW.AMBEDKAREE.COM चा 10 वा वर्धापन दिन

AMBEDKAREE.com

WWW.AMBEDKAREE.COM चा 10 वा वर्धापन दिन

www.ambedkaree.com हे आंबेडकरी चळवळीचे वेब पोर्टल आहे .गेल्या दहा वर्षे सतत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेत जगभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची माहिती संकलित करणे आणि ती माहिती वेब पोर्टल च्या माध्यमातून प्रकाशित करणे हे अविरत चालणारे काम विविध संकटे आणि त्रास सहन करून प्रामाणिकपणे करीत आहे .

भारतीय प्रजासत्ताक दिन अर्थातच 26 जानवरी 2008 हा www.ambedkaree.com चा वर्धापन दिन.गेल्या दहा वर्षात बरीच उलथापालथ झाली .चळवळीतील नवे आयाम तयार झाले ,सोशल मीडिया अधिक गतिमान झाला आणि आम्ही सुरू केलेले हे पोर्टल त्या अफाट माहितीच्या महासागरात एकाकी तग धरून उभे राहिले. दोन भिन्न समाजातील एकविचाराच्या मित्रांनी एका रात्रीत मनांतील संकल्पनेला हे वेब पोर्टल च्या रूपाने उभे केले आज एव्हड्या अफाट स्पेस वरती कोणत्याही गॉडफादर शिवाय ताठ माने ने उभे आहे .ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने सुरु केलेले हे पहिले वेब पोर्टल आंबेडकरी बाण्यामुळेच कुणालाही विकले गेले नाही की झुकले गेले नाही .नव्या तंत्रज्ञानात कुठेही कमी ना राहत आपला प्रवास एकाकी करत आहे आणि तो प्रवास अविरतपणे चालला आहे …….!

गेल्या दहा वर्षात मीडिया आणि त्यात काम करणारे लोक बदले जे सोबत होते ते दूर झाले नव्याने लोक जोडत आहेत.हा प्रवास असाच चालत राहील…!
आपला आवाज आपला मीडिया.
मी www.ambedkaree.com च्या टीम च्या वतीने आपणास अवाहन करतो की आपल्या सभोवतीच्या घडामोडी ,आपले अप्रकाशित साहित्य, लेख ,बातम्या ,विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या लोकांची माहिती ,आपल्या व्यवसायची माहिती,आपले मनोगत,विचार ,आपल्या प्रॉडक्ट व आपण समाजामध्ये देत असलेल्या सेवेबद्दल, आपल्या संघटनेची माहीती,आपल्या व्यवसायाच्या जाहिराती ,आपल्या समाजकार्याची माहिती ,शिक्षण-कला -क्रीडा -सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची माहिती आम्ही संकलित आणि प्रकाशित करत आहोत आपण ती www.ambedkaree.com वर प्रकाशीत करा .
www.ambedkaree.com हे आंबेडकरी समूहाचे सर्च इंजिन आहे. आपला सहभाग महत्त्वाचा आहे .
-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com
संस्थापक,संपादक

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *