मानवतेचे विचार पेरणारा  शाहीर काळाच्या पडद्याआड…..!

जाती अंताच्या लढ्यातील एक शिलेदार ….!

नुकतेच विद्रोही शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन ………!

मानवतेचे  विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..!

‘दलिता रे हल्ला बोल ना…श्रमिका रे हल्ला बोलं ना…’ आणि ‘समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं…’त्यांची आदी गीते आंबेडकरी अन जातीअंताच्या आणि श्रमिकांच्या चळवळीत लोकप्रिय असलेली त्यांची गाणी काळजाचा ठाव घेणरी  कष्ट करणाऱ्या शेतकार्याऱ्याची,आदिवासी अन जाती-पाती च्या बंधनात अडकल्येल्या गरीब माणसांचा आवाज असलेली रचना ते करत .

तासगाव सांगलीतले असलेले शाहीर  कांबळे मुंबईत वडाळा येथे  राहत पण आजाराला  कंटाळून ते नाशिकमध्ये राहत होते .

गाणी आणि कवितांच्या माध्यमातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता यावर  भाष्य करत.

‌१०० दिवस नक्षलवादी लोकांबरोबर संबध  असल्याचा  संशय घेऊन पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबले होते मात्र तुरुंगात त्यांना बराच मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला असा आरोप ते करत पुढें कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली . तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना क्षय आणि पोटाच्या दुखण्याने ते सतत आजरी असत .

अनेक वर्षे विद्रोही आणि जाती अंताच्या चळवळीत काम करत आघाडीवर असलेले शंतनू कांबळे यांच्या जीवनावर आधारित कोर्ट हा सुप्रसिद्ध गाजलेला चित्रपट..!.

सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी  जातीअंतच्या ,वर्गलढ्याच्या चळवळीत कविता अन गीतामधून प्रबोधनात्मक  भाष्य करणाऱ्या व मानवतावादी ,समतावादी विचार पेरणार्या शाहिरांच्या जाण्याने चळवळींचे नुकसान झालेय .

“विद्रोही” मासिकाच्या संपादकीय मंडळावर काही वेळ त्यांनी काम केलंय.

त्यांच्या निधनाबद्दल जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह अनेक सांस्कृतिक संघटनांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *