आंबेडकरी चळवळ आणि त्यातून निर्माण झालेले नेते ……!

आंबेडकरी चळवळ आणि त्यातून निर्माण झालेले नेते ……!

माननीय प्रा.कवाडे सर याना ,
सविनय जयभीम
सर आपले निस्सिम आंबेडकर अनुयायीत्व आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या नावासाठी लाखोंचा लॉंग मार्च काढणारे एक जगमान्य नेतृत्व.

ज्याच्या केवळ सभा म्हणजे धगधगता निखारा असायचा आणि त्यांच्या वाणीतून एक क्रांतिकारी उद्घोषणा असायची…..अन्यायाविरुद्ध लढण्याचा तो बाणा ,कामगार,कष्टकरी वर्गाची तो एक बलदंड कवच असायचा …! पेहराव ही तसाच कोणताही बडेजाव नाही की कोणताही मोठेपणा नाही .पायाला भिंगरी लावल्यागत अखंड महाराष्ट्र फिरणारे तुम्ही ……!

आम्हाला तुमच्या रूपाने आपल्या आंबेडकरी चळवळीत एक प्रोफेसर नेहमी दिसायचा …शिक्षक समाजाला मार्ग दाखवतात ….म्हणून लोक तुम्हा आदराने प्रध्यापक ही म्हणायचे …..!- नामांतराचा लढात तुमच्या नेतृत्वाखाली तेव्हा कित्येक बांधव उपाशी पोटी -शिळ्या भाकरी तुकड्या सोबत खायचे …हे तुम्ही अनुभवले …!

एव्हडा लढवया नेता आपल्या क्षुद्र स्वार्थाने प्रस्थापितांच्या छावणीत घुसतो ….आमदारकी,खासदारकी करीता का त्यांचा संघर्ष.?

जसे हजारो पँथर नामांतराच्या लढात सामील झाले व समाज लढत होता तसा आपल्या अस्तित्वाची लढाई अत्ता अड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे …..त्यांच्या लाखोंच्या होणाऱ्या सभा त्यांना आत्ता समाजाने मान्यता ही दिलीय . आपण सतत प्रस्थापित पक्षांच्या पालखीचे भोई होण्यातच धन्यता मानत आहात.
आपला राग कदाचित अड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर असू शकतो ….ज्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाला केवळ हुजरेगिरी न केल्यामुळे तुमच्या सारख्या लोकांच्या सह्याने इथल्य प्रस्थापित व्यवस्थेने लगाम घातला होता त्या सर्व बंधनाना तोंडत बाळासाहेब जोमाने पुन्हा उभे राहिले ….आणि त्यांचे एकाकी लढणे समाजाने पाहिले समजले आणि मग समाज त्यांच्या मागे लाखोंच्या संख्येने उभा राहिलाय. तुम्हि आंबेडकरी चळवळीतून मोठे झाला आणि शेवटी जेव्हा चळवळ उध्वस्त होताना आपण प्रस्तापिताना जाऊन भेटले आहात.
ठीक आहे अड प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला जवळ नाही केले . तुमचा आत्मसन्मान दुखावला ही असेल . तुम्ही तुमच्या जागी मोठे आहात पण आपण आपल्या मोठेपाणाने किमान चळवळीत शांत बसणे गरजेजे होते मात्र आपणास कॉंग्रेस चे उपकार शांत कसे बसू देतिल हे ही समजू पण म्हणून RSS कडून पैसे घेतले जातात हा गंभीर आरोप का करत अहात?
सर लॉंग मार्च च्या वेळी कुणी पुरविले होते पैसे….!
कुणी केल्या होत्या थैल्या खाली…? ते दिवस आठवत असतीलही पण करणार काय ?.

तुमचे दुखणे ही समजू शकतो आता जनता हे सारे काही समजू लागली आहे तिच्या हातात अत्ता समाज माध्यमे आहेत लोकांना खरे काय आणि खोटे काय हे ही समजते . जनतेची हेटाळणी थांबवा सर .
पण हे खरे पणा अत्ता अपणास कळत नसेल तर तो आंधळे पणा आहे .कारण लाखोंच्या सभा होत असताना खरा आंबेडकरी नेता काय किंवा अनुयायी काय तो शांत बसणार नाहीच तो त्या समाज प्रवाहात आपोआप सामील होतोच पण आपण तेही नाहीं केले .
आपले कार्यकर्त्य सामील झाले पण आपण दूरच राहिलात. सर ते लॉंग मार्च दिवस आठवा तो रखरखत्या उन्हात काळभोर डोळ्यातील जनतेचा आवाज आठवा. अन मग खरे सांगा तुम्ही कुठे आहात ते….!

सर आम्ही तुमचा आदर करतो ,आम्हाला आपली काळजी वाटते .इतिसात आपले नाव चुकीच्या यादीत छापले जाऊ नये याची .चळवळीत आपण दिलेले योगदान मोठे आहे ….म्हणूनच.
हे लिहावे वाटले.

सर तुमच्या सारखे बरेच जण असे बोलत आहेत ,लिहीत आहेत ,काहीजण तर पुरावा ही देण्याइतपत लिहीत आहेत …..आम्ही सर्वा ना हेच सांगत आहोत की

आत्ता पर्यंत जी वाताहत आंबेडकरी चळवळीची झाली ती पुढे होऊ देऊ नये किमान अत्ता आपण निर्णायक लढाईपर्यंत पोहचलो आहोत अत्ता या लढाईत लढताना आपण आपपासतील मतभेद दूर करावेत.

या लढाईत कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,सेना ,बिजेपी यांचे काय होईल? कोण जिंकेल कोण हरेल हे महत्त्वाचे नाहीय महत्वाचे आहे आहे की आपण किती परिणामकारक आहोत याचे आपण आपले राजकीय अस्तिव सिद्ध करणार आहोत त्यावर आपले पुढील राजकीय वाटचाल असेल .म्हणून आपापसात भांडून काही ही साध्य होणार नाही जर आपली मते एकत्रित झाली तर आपले अस्तित्व सिद्ध होईल आणि भारतीय राजकारणात आपण कसे भक्कम आणि परिणाम कारक आहोत हे ही सिध्द होईल .

वंचित बहुजन आघाडीने एक सशक्त पर्याय आपणास दिला आहे त्याचा दूरगामी परिणाम आंबेडकरी आणि समविचारी चळवळीवर होणार आहेत .तरी या आपण सर्वानी याचा गाभिर्याने विचार करावा.काँग्रेस ,राष्ट्रवादी यांच्या सतरंज्या उचलून आमचा आत्मसन्मान वाढणार नाहीय तर तो चळवळीतील लोकांना अर्थात अड प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या पर्याय स्वीकारून वाढणार आहे .करण चळवळ जगली की समाज जागतो हे लक्षात घ्या.
-प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *