ररतेच्या राजाचा स्मृती दिन विस्मृतीत…..?

ररतेच्या राजाचा स्मृती दिन विस्मृतीत…..?

या देशातील महान नेत्यांचे जन्मदिन अन मरण दिन जयंत्या अन पुण्यतिथ्या म्हणुन ओळखल्या जातात.
या देशातील समाजाला दिशा अन प्रेरणा आपल्या महान कतृत्वाने अन कार्याने ज्या ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिले व समाजात नव परिवर्तन घडविले त्यांचे जन्मदिवस आनंदी सोहळे होतात व मरण दिन स्मृतीविषेश होतात. त्यांच्या कार्याची आठवण व त्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा तो दिवस असतो .त्या त्या महापुरुषांचे वैचारिक वारस ,अनुयायी आपआपल्या परिने ते साजरे करतात.

महाष्टात ज्या राजाने स्वाभिमान दिला, हक्काचे स्वराज्य निर्माण केले व रयतेला नव संजवनी दिली ते महाराष्टाचे स्फृर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज .जन्म 19 फेब्रु१६२७/१६३० मृत्यु ३ एप्रिल १६८० वयाच्या ५०-५३
वर्षांपर्यंत अविरत देशसेवा करणारे रयतैचे राजे.


प्रत्येक भारतीयाला अन विषेश महाराष्टिय माणसाला अभिमान वाटतो व ते सर्व जातीधर्माच्या लोकांचे प्रैरणास्थान असलेले महानपुरूष…! त्यांचा स्मृती दिन ….!

महाराष्टाच्या मातीतले एक सुवर्णयुग कर्ता काळाच्या उदरात स्थिरावले खरतर या महामानवांचा स्मृती दिन मोठ्या प्रमाणात विस्मृतीत जातो. हेच अनाकलनिय आहे.

ज्या महाराष्टात महाराजांच्या जयंतीचे वाद उकरुन तीन वेगवेगळ्या तारखांना जयंत्या साजरा करणारे त्यांचे अनुयायी स्मृतीदिन मात्र कुठल्याच तारखेला आठवणीत ठेवला जात नाही.

महाराजांचे कार्य परिसिमांच्या बाहेर आहे. त्यांचा स्मृती विषेश सरकारी पातळीवर सुरू होणे गरजेचे आहे. राजांचे महान कार्य नव्यापिढ्यांना समजले पाहिजे.

महाराजांच्या जन्म तारिखेवरुन वरुन घोळ घालणारे इतिहासकार त्यांच्या मृत्यु संदर्भात मुग गिळुन गप्प बसतात. खरंतर महाराजांचा मृत्यु हा गुढ प्रकारे झाला असे इतिहासकार मान्य करतात. नेमके हेच कारण असावे महारांजा स्मृतीदिन जगासमोर मान्यण्यात आला तर त्यांच्या मृत्युचे खरेपणा बाहेर पडेल इतिहासात लपलेले दाखले उघडे पडतील व तथाकथीत इतिहासकारांचे व शाहिरांचे धंद्दे बंद होतील.

नुकत्यात काही तरुणांनी किल्ले रायगडावरील अशोकालिन बौध्द गुंफाचा शोध लावलाय खरे तर शिवाजी महाराज ज्या परिसरात वाढले व त्यांच्यावर जे संस्कार झालेत ते बौध्द भुमी आहे शिवनेरी किल्ले परिसरात परिसरात सापडलेल्या बौध्द लेण्या अन तिथले संस्कार हे बौध्द भिक्कुंचे सहवासाचे झालेले असावे. मात्र सवयीप्रमाणे इतिहासाच्या काही गोष्टि सोयीप्रमाणे सांगितल्या जातात व त्याच लोकांना बिंबवल्या जातात .

छत्रपतींनी स्वराज्यात आणलेली शिस्त,स्वराज्यात आणलेली नैतिकता,स्वराज्यात आणलेला बहुजनवाद ,स्वराज्यात आणलेला मानवता वाद अर्थात स्वाभिमान,सर्वसामान्य माणसाला दिलेले मानाचे स्थान…हे सर्व बौध्द धम्माचाच भाग आहे ,त्यांनी हाती धरलेले भगवे निशान हे त्याकाळी सभोवती असणार्‍या बौध्दभिक्कुंचे त्यागी चिवराचे प्रतिक असावे याला आता पुरावे मिळु लागतील.
समाजातील अभ्यासक आपआपल्या परीने आता संशोधन करित आहेत शिवनेरी किल्यावर सापडलेल्या बौध्द लेण्या महाराष्टाचा दबलेला वेगळा इतिहास उघडु पहात आहेत.
महाराष्टातील विवीध गड-किल्ल्यांचे आता पुन्हा नव्याने संशोधन होणे गरजेचे आहे. कदाचीत हा दबलेला इतिहास नव्यान जगासमोर येइल.

महाराजांचा आज स्मृती दिन खरतर त्यांचे स्मरण करुन त्यांना मानाची मानवंदना तमाम महाराष्टियाने द्यावयास हवी. त्यांचे कार्य अन त्यांनी दिलेला बहुजनवादी वारसा जपला पाहिजे. सर्वजाती धर्माच्या लोकांना समतेन सन्मानपुर्वक वागवणे व त्यांची सामाजिक सुरक्षा अबादित ठेवणे हिच खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या जयंतीचा वाद सतत तेवत ठेवणारे अनुयायी जर त्यांच्या विचाराप्रणाणे वागु लागतील तो दिवस महाराष्टाच्या अन देशाचा सुवर्ण दिन ठरेल.
—प्रराजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *