जयंती महामानवांची कि संघटनांची ….?

जयंती महामानवांची कि संघटनांची ….?

सध्या बाबासाहेबांच्या जयंती ची तयारी चालू आहे. पण सध्याचे वातावरण पाहता लोकांची मनस्थिती बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हे नसून आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते लोकांना दाखवणे हे आहे. यासाठी लोकांनी विविध संघटनांच्या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे काम करत आहेत आणि या मुले बाबासाहेबांच्या जयंतीची लोकांनी धांगडधिंगा करून टाकला आहे ज्या महामानवाने लोकांना धम्माची शिकवण देऊ केली त्या बाबासाहेबांच्या नावाचा असा गैर वापर लोक करतात लोकांना खरेच महामानवांची जयंती साजरी करायची असेल तर त्यांनी अश्या विविध संघटना विविध पद्धतीने का साजऱ्या कराव्या आज एकाच ठिकाणी असणाऱ्या एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या संघटनेमुळे दोन्ही बाजूला विभागले गेलेत संघटनेच्या प्रेमाखातर बाबासाहेबांच्या जयंतीचे स्वरूप बदलत गेले आहे आणि याला सर्वस्वी दोषी कोण असेल तर समाजाला बाबासाहेब यांच्या पेक्षा संघटना जास्त प्रिय झाल्या बाबासाहेब संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश देऊ केला पण लोकांना त्याची महती कळली नाही आणि त्यामुळे आज हा धांगडधिंगा आपण पाहतोय विविध संघटनेमुळे संघटन शक्ती वाढली पाहिजे होती पण आज विभाजित अवस्थेत आपणस पाहायला मिळते आज बाबासाहेबांच्या संघटनांची अवस्था या लोकांनी अतिशय बिकट करून ठेवली बाबासाहेबांच्या संघटना आपसापासात च लढताना आपणास पाहायला मिळतात या संघटनांनी एकमेकाला साहाय्य करायचे सोडून आपसात भांडत बसतात यापेक्षा सर्वात चळवळीचे अपयश ते दुसरे काय असेल बाबासाहेबांच्या विचारांवर काम करताना अश्या गोष्टी समाजात घडत असतील तर बाबासाहेबांच्या विचारांचा आपण अपमान करतोय असे मी म्हणेन आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार म्हणून आम्ही लोकच आहोत कारण आम्ही बाबासाहेब यांचे कार्य न पाहता आम्ही संघटनेत अडकून पडलो आम्ही आम्हाला संघटनांना पूरक असे वातावरण निर्माण करता आले नाही त्यामुळे आज या समाजाचे सर्वात नुकसान झाले आणि हे समाजाची उन्नती साधण्यास असलेली बांधा आहे.

जयंतीच्या माध्यमातून संघटनांमध्ये असणारे वितुष्ट आज जगासमोर येत आहे लोकांना धम्म कळलेला नाही धम्माचा वारसा माहिती नाही आज त्यासाठी काम करण्यास पुढाकार कोणी घेत नसतो मात्र संघटनेच्या नावाखाली एखादे जयंतीचे इव्हेंट साजरे करून लोकांना ते समाजात किती मोठे विभाजन आहे हे आपण दाखवत असतो सर्वांना एकच विनंती आहे कि प्रत्येकाने संघटनांना पुरक असे वातावरण तयार करून काम केली पाहिजे आणि त्यासाठी किमान समाजाने पुढाकार घ्यावा बाबासाहेबांची जयंती सर्वानी एकत्र मिळून साजरी केली पाहिजे पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि संघटनेच्या प्रसिद्धी साठी जो तो बापाच्या जयंतीचा धांगडधिंगा करून टाकतो

ज्या महामानवाला विश्वाने वंदन करावे त्याचे अनुयायी एकत्र येऊ शकत नाही बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी २५६ देश एकत्र येऊ शकतात मग बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी त्यांच्या अनुयायी असणाऱ्या १ तालुक्यातील लोकांना एकत्र यायला लाजा का वाटतात

बाबासाहेब यांच्या विचारांचा खून करून जयंती साजरी करणाऱ्या संघटनांनी बाबासाहेबांची जयंती साजरी च करू नये जग बाबासाहेबांची जयंती साजरी करते अख्ख जग बाबासाहेबाना वंदन करते तिथे भारतातील मूठभर लोकांनी वंदन नाही केले म्हणून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला कमी पणा येणार नाही

म्हणून संघटित व्हा संघटना भले हि वेगळया असल्या तरी एकत्र येऊन च महामानवांची जयंती साजरी करावी जगातील लोक एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असतील तर आम्ही का करत नाही एकाच घरातील लोक आम्ही असे विभाजित का राहतोय विचार आणि संकल्प करा जयंतीला येणाऱ्या काळात बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करू बाबासाहेबांनी दिलेली ओळख जगाला दाखवून देऊ आणि आम्ही संघटित आहोत हे जगाला सांगू

चला तर नव्याने सुरु करू संघटनेला जास्त महत्व न देता बाबासाहेबांच्या विचारांना जास्त महत्व देऊ

☸️जयभीम 🙏नमो बुध्दाय,

रविंद्र सावंत
प्रशांत माळी
मुकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *