समाजात मनुस्मुर्ती आजही जिवंत आहे……?

समाजात मनुस्मुर्ती आजही जिवंत आहे……?

भारतीय स्रीला युगांयुगाच्या तरुंगात ठेवणारी व्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था त्याची आचारसंहिता म्हणजे मनुस्मुर्ती त्या नुसार स्रियांना आर्थिक अधिकार अथवा आर्थिक स्वत्रांत्य नाकारणारी व्यवस्था.मनुस्मुर्तीचे कायदे स्रीयाच्या सामाजिक श्रमावर पुरुषाची मालकी असावी असे सांगते.

ज्या मनुस्मुर्तीने उच्च जातीय स्रीला घराच्या बाहेर श्रम करण्यास नाकारत होती.तीच उच्चजातीय स्री आज सर्व ठिकाणी आघाडीवर दिसते.ज्या उच्च जातीय लोकांनी मनुस्मुर्ती चे समर्थन केले होते. तेच त्याचा जास्त लाभ घेताना दिसतात.

भारतात सर्व ठिकाणी महिलांचे आजचे स्थान पहिले तर मनुस्मुर्ती जिवंत नाही.असे वाटते पण बहुजन समाजांच्या घराघरातील व्यवहार सण,उत्सव डोळस पणे पाहिल्यास महिलांचे धार्मिक सन उपास तापास आणि मंदिरातील बहुजन समाजांच्या महिलांची उपस्थती पाहिली कि मनुस्मुर्ती जिवंत आहे हे स्पष्ट दिसते. महिलांची शिक्षणातील आणि नोकरी धंद्यातील प्रगती पाहली तर मनुस्मुर्ती जिवंत नाही असे वाटते.पण जेव्हा बँका,सरकारी कार्यालय, रेल्वे. शाळा कॉलेज मधील सुशिक्षित महिलांना नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगात पाहल्या जातात तेव्हा मनुस्मुर्ती जिवंत  दिसते.सिनेमा,नाटक,टिव्ही मालिका मध्ये जेव्हा महिला नायिका,खलनायिका पाहल्या जातात तेव्हा महिलांनी मनुस्मुर्ती नाकारलेली दिसते.पण जेव्हा देवाच्या आशीर्वादाने मुल झाले किंवा प्रगती झाली हे दाखविल्या  जाते  तेव्हा मनुस्मुर्ती महिलाच्या मेंदूत कायम कोरली आहे हे दिसते.

पहिल्या सारखी कडक मनुस्मुर्ती आज जरी नसली तरी ती वेगवेगळ्याप्रकारे अस्तित्वात आहे.ती कायम स्रीयाच्या मेंदूत राहण्याचे काम अनेक ब्राह्मणी साहित्यिक विचारवंत कसे बेमालूम पद्धत करतात याचे ठळक नांवे नरहर कुरुंदकरांच्या “मनुस्मुर्ती : काही विचार”या पुस्तकाचे परीक्षण कॉम्रेड शरद पाटील यांनी केले त्यावेळी त्यांनी या सर्व बुद्धी प्रामाण्यवादी ब्राह्मणाची यादीच दिली आहे.(संदर्भ सत्यशोधक मार्क्सवादी जुले ऑगस्ट १९८३)  आंबेडकरी चळवळीतील लोक वगळता इतर बहुजन समाज मनुस्मुर्तीच्या चैकाटीत बंधिस्त आहे.

बहुजन समाज किंवा इतर पुरोगामी संस्था संघटना पक्ष २५ डिसेंबर मनुस्मुर्ती दहन दिन साजरा करीत नाही.काही जयभिम कॉमरेड असलेले कार्यकर्ते त्यात हिरीरीने भाग घेतात. २५ डिसेबर भारतीय महिला दिवस म्हणून जाहिर व्हावा अशी मांगणी १९९६ साला पासुन केली जाऊ लागली डॉ प्रमिला संपत यांनी पुढाकार घेउन सर्व प्रथम चंद्र्पुरच्या दीक्षाभूमीवर विकास वंचित दलित राष्टीय महिला परिषद झाली होती त्यात ही मांगणी झाली त्या नंतर अड .बाळासाहेब (प्रकाश )आंबेडकर प्रणित संस्था संघटना करीत आहेत त्याला पुढे रिपब्लिकन महिला आघाडी ने २५ डिसेंबर हा भारतीय स्रीमुक्ति दिन म्हणून जाहिर व्हावा अशी मांगणी केली.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह केला होता.त्यात मनुस्मुर्ती,श्रुती स्मृती,पुरणाला स्पष्ट नाकारून त्याचे दहन करण्याचा ठराव करण्यात आला होता.हा ठराव विनायक सहस्त्रबुद्धे यांनी मांडला आणि राजभोज यांनी त्याला पांठिबा दिला. मनुस्मुर्ती दहनाचा ठराव झाल्या नंतर रात्री नऊ वाजता एका खड्ड्यात अस्पुश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मुर्तीची जाहीर होळी करण्यात आली.या महाड च्या सत्याग्रह यशस्वी करण्यात ज्यांनी जीवा पार मेहनत घेतली ते सर्व शांताराम पोतनीस,केशवराव देशपांडे,रा.वामनराव पत्की, कमलाकर टिपणीस,पुण्यावरून सुभेदार घाडगे,रा.थोरात.हि मंडळी होती या सर्व बाबासाहेबाच्या सच्च्या अनुयानी त्याचे जोरदार समर्थन केले म्हणून यांच्या स्रिया शिक्षण नोकरीत सर्व ठिकाणी आघाडीवर आहेत पण त्या आज मनुस्मुर्ती चे दहन दिन साजरा करीत नाहीत सर्व ठिकाणी मनु ने नकारलेले अधिकार घेतात आणि योग्य ठिकाणी मनुस्मुर्ती च्या इतर धार्मिक कायदे कलमाचा काटेकोर अंमल करतात त्यामुळे च भारतात मनुवादी संघटना पक्ष वाढत आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मुर्ती चे जाहिर दहन केले होते ते केवळ महिलाच्या मुक्ति साठी आज महिला मुक्त आहेत पण डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे ते अभ्यासपूर्ण परिश्रम आणि त्याची अंमलबजावणी करीता केलेला संघर्ष महिला विसरल्या आहेत.

बहुजन समाजातील लोक किती ही फुले,शाहु, आंबेडकर यांची नांवे घेऊन जयजयकार करीत असली तरी त्यांनी खरी विचारधारा स्विकारली नाही.हे त्यांच्या आचरणातून दिसून येत आहे. बहुजन समाज म्हणजे ८५ टक्के मागासवर्गीय समाज जो विविध जाती आणि पोट जातीत विखुरला आहे.तो सुशिक्षित होऊन पुढे गेला असे दिसत असले तरी त्यांचावर हजारो वर्षाचे बंदीस्त करणारे संस्कार तो विसरायला तयार  नाही.

विज्ञानाने किती प्रगती केली असली तरी तो स्वतःला त्या बंधनातून मुक्त भरारी घेण्यास तयार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ती २५ डिसेंबर १९२७ ला महाड येथे जाहीर पणे होळी करून जाळली असली तरी आज २०१७ मध्ये तिची नवीन मराठी आवृत्ती पेशवा सरकारच्या आशीर्वादाने बाजारात खुले आम विकली जाते आणि ते घेणारे बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजातील सर्व प्रकारचे लोक आहेत.

त्याला पुरोगामी समाजवादी,राष्ट्रवादी यांनी दाखविण्या पुरता विरोध केला.त्यात आंबेडकरी चळवळी तील सुशिक्षित लोक पण मागे नाहीत.ते मनुस्मुर्ती माहिती करीता अभ्यास करण्यासाठी विकत घेतात.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली म्हणजे ती बहुजनांच्या विकास,कल्याण,अधिकाऱ नाकरणारी होती म्हणुन जाळलीनां…?

मग आपण बाबासाहेबांनी लिहलेल वाचले पाहिजे.म्हणजे आपणास योग्य दिशा मिळेल. म्हणूनच बहुजन समाजातील सर्व मागासवर्गीय जातीजमातील सर्व पुरुष महिलानी मनुस्मुर्ती दहन का केले यांचा इतिहास वाचावा तर खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती होईल.

बॉब कट केस ठेऊन,जीन पॅन्ट टी शर्ट घातले म्हणजे स्त्री मुक्त आहे असे समजणे मूर्खपणाचे लक्षण आहे.आज सर्व क्षेत्रात मुक्तपणे ती नोकरी,धंदा,कला कौशल्य दाखवीत असली तरी ती लैंगिक,मानसिक,-आर्थिक दृष्ट्या धर्म संस्काराच्या बाहेर जात नाही. गुरुवार शुक्रवार सह सर्व रिती रिवाज योग्य वेळी काटेकोर पणे त्यांचे पालन करते म्हणुन तीला, बॉब कट,जीन पॅन्ट टी शर्ट घालण्याची विशेष सवलत मिळते आहे म्हणुन ती मोठ्या प्रमाणात मनुस्मुर्ती दहन दिन साजरा करीत नाही.

बहुजन समाजात मागासवर्गीय जाती जमातीत वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे आहे म्हणुन बहुजन समाजात मनुस्मुर्ती आज ही जिवंत आहे.

मराठा समाजात मराठा सेवा संघाने प्रचंड वैचारिक प्रबोधन केले.मग त्यांच्या महिला मनुस्मुर्ती दहन कार्यक्रम घेतात का?.( माफ करा या बाबत मला माहिती नाही,कधी वाचले,आणि पाहिले नाही ) मग कोणत्या स्त्रीया त्यांच्या संघटना मनुस्मुर्ती दहन दिवस साजरा करतात?.

सर्वच समाजाच्या स्त्रीयांनी मनुस्मुर्ती दहन दिन म्हणून साजरा करायला पाहिजे.तर ती वैचारिक दृष्ट्या संपेल. अन्यता ती केवळ बहुजन समजतच नाही तर सर्व समाजात जिवंत राहील.

सागर रा तायडे ,9920403859 भांडुप मुंबई ( लेखक हे कामगार चळवळीतील क्रियाशील असून देशभरातील असंघटित  कामगार याकरिता काम करतात.)

Author: Ambedkaree.com

1 thought on “समाजात मनुस्मुर्ती आजही जिवंत आहे……?

  1. माननीय संपादक प्रमोद जाधव आंबेडकरी.कॉम
    जयभिम माझे लेख प्रसिद्ध केल्या बद्दल मनःपूर्वक आभार धन्यवाद!.

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *