हळदी समारंभ नाकारून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

हळदी समारंभ नाकारून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन…!

समाजात वाढती व्यसनाधिनता,अंधश्रध्दा ,अनिती यावर जनजागृती होणे गरजेचे आहे .मंगलपरिणयाच्या पुर्व संध्येला होणारा कार्यक्रम म्हणजे हळदी संमारंभ .या संमारंभात येणारे नातेवाईक व या आनंदाच्या मंगलमय सोहळ्यात खास पाहुणचार असतो तो मद्याचा….
खरे तर आयुष्याची मंगलमय सुरुवात करणार्‍या या कार्यक्रमात पंचशीलाची होणारी अवहेलना थांबवावयास हवी.

सुरुवात करयची तर स्वतापासुन करावी या साठी सम्यक संकल्प सामाजिक संस्थेचे सदस्य आयु. योगेश पवार मु. पो. खानवली ता. लांजा जि. रत्नागिरी यांनी बहीण आयु. ज्योती हिचा मंगलपरीणय आज दि. १ मे २०१८ रोजी संपन्न होणार आहे तरी या मंगलपरीणयापूर्वी होणारा “हळदी समारंभ” नाकारुन काल दि. ३० एप्रिल रोजी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले .
समाजात चालत असलेल्या अनिष्ट प्रथेविरोधात उचललेले पाऊल नक्कीच अभिमानास्पद आहे. योगेश पवार यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाला सम्यक संकल्प सामाजिक सेवा संस्था (रजि.) मुंबई,www.ambedkaree.com ,अस्मिता मल्टिपर्पज आर्गनाझेशन आदिं संस्थांच्या वतीनं
भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

वृत्तांकन : बुध्ददीप सावंत.

One thought on “हळदी समारंभ नाकारून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *