आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार मान. दिवाकर शेजवळ  यांचे नवीन पुस्तक प्रकाशनाच्या तयारीत.

आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला!

दिवाकर शेजवळ.

आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी.
दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता. आंबेडकरी वृत्तपत्रांच्या इतिहासात आपल्या अग्रलेखातून झंजावात उभा करणारे दैनिक लोकनायकचे माजी कार्यकारी संपादक. आणि त्या आधी दशकभर दलित चळवळीतील अग्रणी.

त्यांचे चार दशकांतील ऐतिहासिक लिखाण ग्रँथरूपांने प्रकाशित करण्याचा निर्णय सुमित प्रकाशनाने घेतला आहे।
त्याची सलामी त्यांनी आंबेडकरी चळवळीतील दिग्गज असामीवर लिहिलेल्या मृत्यूलेखांच्या संग्रहातून दिली जाणार आहे।

त्यात 1)डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिलेदार राहिलेले रिपब्लिकन नेते ऍड बी सी कांबळे, 2) रा सु गवई, 3) बहुजन समाज पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष कांशीरामजी, 4) झुंजार प्यान्थर नेते भाई संगारे, 5) पद्मश्री नामदेव ढसाळ, 6) एस एम प्रधान,7) बाबुराव शेजवळ, 8) रमाबाई कॉलनीचे जनक डी बी पवार,9) अलौकिक प्रतिभेचे धनी कवी गायक नवनीत खरे, 10) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे एक शिल्पकार मधुकर तुपलोंढे 11) आंबेडकर भवनच्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा व्ही एस असवारे आदिंचा समावेश आहे।

दिवाकर शेजवळ यांचा हा लेखसंग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या महापरिनिर्वाण दिनाआधीच आपल्या हाती येईल।
सुमित प्रकाशन ही प्रथितयश प्रकाशन संस्था असून आम्ही आतापर्यँत प्रकाशित केलेले अनेक ग्रन्थ गाजले आहेत.
-संजय कोचरेकर ,सुमित प्रकाशन मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *