आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अटक सत्र ना.आठवलेंना खुले पत्र…….!

सन्माननीय नामदार आठवले साहेब,
नमस्कार ! जय श्रीराम !!
एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल चार महिन्यांनंतर भीमसैनिकांचे अटकसत्र सुरू आहे याची आपणास किमान कल्पना असेल. कारण आपण सत्तेत सहभागी आहात. आंबेडकरवादी जनतेचे संसदेत प्रतिनिधित्व करत आहात ! आपण केवळ मुखवटा आहात, हे आम्ही जाणतो. पण लाजूनकाजून का होईना या प्रकरणात आपण किमान तोंड उघडाल… एखादी चारोळी ऐकवाल असं वाटलं होतं. वाटलं नव्हतं आपल्या बोलण्यावरही बंदी घालण्यात आलीय् ! असो.

गुलामाकडून अपेक्षा व्यक्त करून आम्ही आपणास धर्मसंकटात टाकू इच्छित नाही.
ही आमची लढाई आहे. आम्हीच लढू…!

आपलं मंत्रिपद आपणास लखलाभ !!
आपण असाल… यापुढे राहाल कदाचित मंत्री. कारण मनुवाद्यांना आपल्याएवढा सत्तांध, लालची, लाचार माणूस दुसरा शोधूनही सापडणार नाही. आज सत्तेचं क्षणभंगूर वैभव आपल्या पायाशी लोळण घेत असलं तरी समस्त आंबेडकवादी जनतेच्या नजरेत आपण स्वाभिमानशून्य याचक…बिग झिरो आहात !
एके काळच्या पॅन्थरला अखेरचा
जय भीम !!

#भीमप्रकाश_गायकवाड

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *