मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार पडल्या .जवळजवळ पन्नास हजारांहून जास्त लोक परिषदेला हजर होते. […]

शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात होरपळ सोसत अखेरीस समर्पण दिले. तर, माईंनी व्याधी विकाराने […]

लोकशाहीचे दोन शत्रू -एक हुकूमशाही आणि माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ********* ब्रम्हदेशातील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश यू चॅन ट्यून (Hon’ble justic U chan Htoon Judge of the Supreme court of the Union of Burma) दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज च्या बुद्ध भवन येथे आयोजित भव्य सभेत […]

पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता संघाचा प्रश्न असो, वसतिगृहे चालवण्याचा प्रश्न असो, अगर जिल्ह्याजिल्ह्यामध्ये […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. शोमान काँगो, सरूताहीको, तैंशाकुठेन, दायनीची, अमिदा, शाखा, याकुशी, […]

Savitribai Phule (3 January 1831 – 10 March 1897) was an Indian Social Reformer, Educationalist, and Poet from Maharashtra. She is regarded as the first female teacher of India. Along with her husband, Great Social Reformer Mahatma Jyotirao Phule, she played an important role in improving women’s rights in India […]

बगलबच्चे कोण? दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत म्हणत की हिंदू-मुसलमानांचे ऐक्य केल्याशिवाय व अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय […]

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कलांची उत्तम जान होती. बाबासाहेब…..! ते वयाच्या बारा – तेराव्या वर्षी उत्तम तबला वाजवत. स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत. एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप छान तबला वाजवला, त्यावेळी लोकांनी तोंडात बोटे […]

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच […]