धम्मचक्र प्रवर्तन दिनी – सर्वात मोठी ग्रन्थ विक्री…

 

धम्मचक्र प्रवर्तन दिनी – सर्वात मोठी ग्रन्थ विक्री..

14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस अशोका विजयादशमीचा होता. तेव्हापासून अशोका विजयादशमीच्या दिवशी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक देश आणि विदेशातून धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा पाहण्यासाठी येतात. तथागत भगवन गौतम बुद्ध आणि महामानाव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा भूमीवरच्या भव्य बौद्ध स्तुपामधील अस्थी कलशाचं दर्शन घेऊन त्यासमोर ते नतमस्तक होतात.

62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरात धम्म बांधवांचा जनसागर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात जमा झाला होता मात्र यावर्षी गर्दीचे अणि ग्रंथ /पुस्तक विक्रीचे सर्व विक्रम मागे सारत अंदाजे १० कोटीची ग्रन्थ विक्री झाल्याचे   ABP माझा च्या बातमी पत्रात म्हटले आहे.

वाचन संस्कृती संपत चालली आहे, नवी पिढी वाचनाकडे लक्ष देत नाही असे आपण नेहमीच म्हणतो मात्र, नेमकं उलट चित्र नागपूरच्या दीक्षाभूमीवर आल्यावर पाहायला मिळले .धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर विविध विषयांवरील पुस्तकांच्या खरेदी विक्रीचे शेकडो स्टॉल्स पाहायला मिळाले .महामानव डॉ बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आलेला प्रत्येक माणूस दीक्षाभूमीवरुन एक तरी पुस्तक घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या अवघ्या दोन दिवसांत दीक्षाभूमीवरुन 10 कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


कोणत्याही धार्मिक उत्सवात पुस्तक विक्री एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नहीं यावर्षी सर्वच उच्चांक पर करत बौध्द धम्मीयानी आपली परंपरा कायम रखली आहे .देशाच्या अणि जगाच्या कण्णकोपऱ्यातून येणारा प्रत्येक अनुयाही हा आपले वैचारिक परिवर्तन हे पुस्तके अणि ग्रंथांच्या माध्यमातूनच करीत आहे याचे हे उत्तम उदहारण या निमियताने पहायला मिळते.
दीक्षाभूमीवर अनेक स्टॉल्सवर डॉ .बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्या विचारांवर आधारित पुस्तकांशिवाय राज्यघटनेचे विविध पैलू समजावून सांगणारे ग्रंथ, दलित चळवळीशी संबंधित ग्रंथ, जगातील विविध ठिकाणच्या सामाजिक धार्मिक क्रांतीवर आधारलेले ग्रंथ या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकाच ठिकाणी ज्ञानाचा असा खजिना उपलब्ध होत असल्यामुळे युवा वर्ग, नोकरदार वर्ग दीक्षाभूमीवर येऊन पुस्तक खरेदी आवर्जून करताना दिसतो.

जगात सगळीकडे वाचन संस्कृती चे प्रमाण कमी होतं आहे मात्र प्रति वर्षी मोठ्या जनसंख्येने सजरा होणार नागपूर मुक्कामीच धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी आपले पुस्तक विक्रीचे आकडे मोडीत काढत आहे .
देशाच्या कानांकोपऱ्यातून येणारे बौद्धम्मीय नागपूरच्या दिक्षाभूमीतून करोडोंचे ग्रंथ भांडार विकत घेऊन जात आहेत.

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *