नव्या भारिप-एम आय एम च्या युतीने काँग्रेसवाल्यांची गोची ……..!

काँग्रेसवाल्यांची गोची ……..!

सतत निवडणुकीत बौद्ध, दलित आणि मुस्लिम पक्षाच्या नेत्यांना हिंदुत्व वादयांची भीती दाखवून असमान राजकारण खेळणाऱ्या काँग्रेसला अड आंबेडकर यांनी एम आय एम युती करण्याची घाई केली असे वाटते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मत मांडले .

ते पुढे म्हणतात की बिजेपी आणि शिवसेना युतीला रोखण्यासाठी  सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे . महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्ष्याची महायुती करण्याचा त्यांचा मानस आहे.

येणाऱ्या पुढील सर्व निवडणुकीत ही महाआघाडी बिजेपी आणि शिवसेना या विरोधात असेल या महायुतीत भारिप ला सामावून घेण्यासाघी काँग्रेस प्रयत्न करीत होते . मात्र त्या अगोदरच अड आंबेडकर यांनी AIMIM शी युती कण्याची घाई केली आहे .

सतत बोलणी करण्याची भाषा करायची आणि आंबेडकरी पक्षांना झुलवत ठेवायचे हे नीती कायम काँग्रेस आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने ही चालू ठेवली होती .आंबेडकरी पक्ष केवळ नावलाच असायचे बाकी हुकूमत यांची यांच्या हुकूमातीला “भारिप” च्या  या खेळीने जाग आलीय .कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणूनच आंबेडकरांनी युतीची घाई केली असे म्हटले आहे .

एवढे मात्र खरे की प्रकाश आंबेडकर यांची चाल योग्य रीतीने चालू आहे कारण ही युती जर अस्तित्वात आली तर

राज्यात एक नवे समिकरण उभे राहिल आणि खऱ्या अर्थाने शोषित वंचीत समाज राजकीयदृष्ट्या सबळ होईल.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआईएमआईएम) आणि

भारिप बहुजन महासंघ (बीबीएम) यांची ही युती 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक निवडणूका या पुर्ती राहील त्याची घोषणा शनिवारी युतीच्या नेत्यांनी केलीय.

एआईएमआईएम प्रमख असदुद्दीन औवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दोन्ही पक्षांमधील प्रारंभी चर्चा सकारात्मक झाली झाली असून त्याची प्रभावी परिणाम समोर आले आहेत . युतेचे प्रमुख नेते अड प्रकाश आंबेडकर 2 ऑक्टोबर ला होणाऱ्या औरंगाबाद येथील संयुक्त सभेला संबोधित करतील.त्याच सभेला मीही उपस्थिती राहणार असून युतीची औपचारिक घोषणा करू .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *