भंडारा गोंदियातील बहुजन, आदिवासी, दलित, बौद्ध, मुस्लिम, मराठा, धनगर यांनी कंबर कसली आहे

 

भंडारा गोंदियातील बहुजन, आदिवासी, दलित, बौद्ध, मुस्लिम, मराठा, धनगर यांनी कंबर कसली आहे

 

लटारी मडावी या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्यासाठी भंडारा गोंदियातील बहुजन, आदिवासी, दलित, बौद्ध, मुस्लिम, मराठा, धनगर यांनी कंबर कसली आहे. पहिल्यांदा राजकीय चळवळीची ही खरी नांदी सुरू झाली आहे. भारिप बहुजन महासंघ हा पक्ष खऱ्या अर्थाने एक राजकीय पक्ष म्हणून पुढे येत आहे जिथे आदिवासी उमेदवार देऊन एक मोठा बदल घडून आणला आहे.
आदिवासी समूहातील लटारी मडावी हा आवाज असून अतिशय अभ्यासू आणि सामाजिक चळवळीतील अग्रगण्य नाव आहे. देशातील आदिवासी एक झाला तर देशात एक वेगळंच चित्र निर्माण होणार आहे. बौद्ध, मुस्लिम यांनी आदिवासी समूहाच्या या आवाजाला साथ देऊन भंडारा-गोंदिया ही निवडणूक अतिशय ताक्तीनिशी लढून आपल अस्तित्व दाखवून दिले पाहिजे.
यासाठी पँथर सेना सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास, राज्यात आणि देशात आपोआप तिसरा पर्याय निर्माण होतो, भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष अस्तित्वात असल्याचे दाखवले जाते आणि ही खेळी जाणीवपूर्वक खेळली गेलेली आहे. या दोघांनाही तिसरा नको आहे यांचे अजेंडे सुद्धा एकसारखेच आहेत. परंतु या पोटनिवडणुकीत जर भारीपने झेप घेतली तर परिवर्तन देशभर होणार आहे. देशातला आदिवासी एकवटल्याशिवाय राहणार नाही.
जातीय राजकारणातून आभार पडत बाळासाहेबांनी प्रगल्भ आणि भविष्याचा विचार करून जो उमेदवार दिलाय तो अतिशय चांगला असून त्यासाठी कामाला लागले पाहिजे.
काँग्रेस ने तेंव्हाच बाळासाहेबांचं ऐकून आदीवासी राष्ट्रपती पदी उमेदवार दिला असता तर आज चित्र वेगळं असतं पण मुळातच हा नवा बदल घडून आणणाईची धमक कोणातच नाही. तेंव्हा आता आपल्यालाच हे राजकीय युद्ध सर करावे लागेल.

– पँथर सेना, महाराष्ट्र्र राज्य यांच्या FB वॉल वरून सभार

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *