मराठी साहित्यातील एक पर्व-पद्मश्री दया पवार…..!

गावकुसाबाहेर च्या जगाचे वास्तव जगाला आत्मचरित्राच्या माध्यमातुन सांगणारा  पहिला साहित्यिक

-दगडू मारुती पवार अर्थात पद्मश्री दया पवार

त्यांच्या त्या साहित्य कृतीतून पांढरपेशा मराठी साहित्यिक विश्वात खळबळ माजून साहित्याचा नवा आयाम देणारे आणि तमाम शोषित पीडित ,कामगार वर्गाचा आवाज आपल्या परखड लेखणीने जगासमोर मांडणारे ,तमाम आंबेडकरी आणि दलित साहित्याला नव्या उंचीवर नेणारे साहित्यातील महामेरू दि दया पवार यांना त्यांच्या स्मृती दिनी www.ambedkaree.com चे विनम्र अभिवादन .

“बलुत” पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे. त्‍यांचा जन्म नगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले.संगमनेर येथील बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी आपले  शिक्षण पूर्ण करीत केले.  दया पवार यांना साहित्यातील भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार  मिळाला आहे.

पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

बलुत (आत्मकथन)

अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).

कोंडवाडा (कवितासंग्रह)

चावडी (कथासंग्रह)

जागल्या (कथासंग्रह)

धम्मपद (कवितासंग्रह)

पाणी कुठंवर आलं गं बाई… (वैचारिक)

पासंग(कथासंग्रह)

’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.

बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)

विटाळ (वैचारिक)

“बाई मी धरण बांधते-मरण कांडते “ही सर्वात गाजलेली कविता .

दया पवार हे मराठीतील साहित्याचे एक प्रमुख दिपस्तंभ आहेत त्यांच्या  साहित्याने मुका बोलू लागला त्यानंतर मराठीत अनेक गावकुसाबाहेरील वंचित दलित,आदिवासी, कैकाडी,वंजारी,डोंबारी…..भटके विमुक्त समाजातील लेखकानी आपला आवाज बुलंद केला .

मराठीतील विद्राही कवियत्री प्रा प्रज्ञा दया पवार या त्यांच्या कन्या

पद्मश्री दया पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्यातील एक पुरस्कार देण्यात येतो जे साहित्यिक उत्तम कामगिरी करतात त्यांना या पुरस्काराचे मानकरी होतात .

-प्रमोद रामचंद्र जाधव

www. ambedkaree. com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *