मरण स्वस्त होत आहे..कोकणातील दुरावस्था….आमदार-खासदार यांचे दुर्लक्ष

मरण स्वस्त होत आहे..कोकणातील दुरावस्था….आमदार-खासदार यांचे दुर्लक्ष

मुक्काम पोष्ट हर्दखळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी.

कोकणात सह्याद्रिच्या डोंगररांगामध्ये निसर्गाची उधळण पहायला मिळतै.कोकणातील उंच सह्याद्रिची रांगेत अन विशाळगडाच्या पश्चिम कड्यापासुन काही अंतरावरच उंच नावा डोंगराच्या कुशीत वसलेला हा गाव कायमच विकासापासुन थोड्या अधिक प्रमाणात मागासच आहे .
याच गावात स्वातंत्र्य सैनिक झालेत,राजकारणी अन लेखक पत्रकारही झालेत .पण ग्रामिण ठिकाणच्या समस्या काही संपत नाहीत.
गावात जेमतेम ८००-९०० ची वस्ती आहे त्यात बर्‍याच प्रमाणात वयस्कर नागरिक राहतात .मात्र या गावाचा जिल्हा ,तालुका अन रोजच्या जगण्यासाठी लागणारी रसद पुरविण्यासाठी जे दळण वळणाचे साधन आहे त्यासाठी लागणारा रस्ताच गेली दहापंधरा वर्षे नाष्ठ झाला आहे .गावात पोहचण्यासाठी व गावातुन बाहेर जाण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतुन नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना ,आजारी माणसांना ,गरौदर
स्रियांना अत्यंत जीव मुठीत घेवुन जावे लागत आहे .रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे गावातील कित्येक नागरिक आपल्या जीवाला मुकले आहेत.

 

या गावातील विकासावर काम करणार्‍या विविध संस्थाच्या कार्यकर्त्यांची फळी उभी आहे मात्र तरीही विविध पक्षातील राजकारणी व संबधीत खात्याला गावातील कार्यकर्त्ये ,समाजसेवक अन काही नागरीकांनी आपआपल्या परीने निवेदने ,अर्ज करत आहेत मात्र निष्ठुर व्यवस्थेला अजुनही जाग येत नाही.

गेल्या पावसाळ्यात तर चक्क शाळेतील लहान मुलांनी एकदिवस श्रमदान केले मात्र त्याचाही गांभिर्याने सरकार व्यवस्थेन घेतले असे जाणलेले दिसत नाही.

गावातील मान्यवर विविध राजकारणी आणि राजकिय पक्षात राज्यस्तरिय,जिल्हास्तरिय पदे घेवुन आहेत मात्र त्यांनी ह्याकडे लक्ष दिला तर बरेच होईल.

सध्या मात्र या गावातील सर्वसामान्य नागरिकाला आपला जीव मुठीत घेवुन …
मरण विकत घेवुन जगावे लागत आहेत.

जिल्हा परिषद रत्नागिरी, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट राज्य ,रस्ते विकास प्राधिकरण अन प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदि मार्गातुन या विभागातील लोकप्रतिनिधी,आमदार ,खासदार अन प्रशासन यांनी कृपया लोकांच्या जीवाशी खेळु नये अन्यथा उग्र आंदोलन करण्यासाठी नागरिक तयार असतील ..हे विसरू नये.

-प्रमोद रामचंद्र जाधव,

हर्दखळे -कल्याण-मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *