गाजवाजा न करता ही करू शकता समाजकार्य.अर्थात संवेदना असतील तर …!

गाजवाजा न करता ही करू शकता समाजकार्य.अर्थात संवेदना असतील तर …!

एक रक्तदान करणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्यांची तळमळ अन त्यांनी कृतीतून दिले सामाजिक कार्य करण्याची प्रभावी प्रेरणा
वाचा त्यांच्याच शब्दांत……!
खास  www.ambedkaree.com साठी.

काल 14 जून जागतिक रक्तदान दिवसांनी कालच अचानक प्रबोधन मंच या ग्रुप वर, एक केईएम हॉस्पिटल मध्ये एका सतरा वर्षाच्या मुलाला A+ या रक्ताची गरज आहे आणि त्याच्या वडिलांचा मोबाईल नंबर पण दिला होता,तसे तर मी आतापर्यंत जवळ जवळ 15 ते 20 वेळा रक्तदान केलं आहे,मी लगेच खात्री करण्यासाठी फोन केला आणि त्या मुलाच्या वडिलांकडे सांगितले की उद्या सकाळी दहा वाजता केईएम हॉस्पिटल मध्ये येतो असे सांगितले,रात्रीच माझ्या पत्नीला सांगितले की उद्या मला लवकर हॉस्पिटल ला जायचे आहे ,एका मुलाला रक्तदान करायला,तशी माझी पत्नी जेव्हा रक्त दान करण्याचा विषय निघतो तेव्हा थोडी ती नाराजच असते,करण रक्त म्हटले तर जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण होतो.तशी ती काहीही ना बोलता रक्तदान करायला जाणार म्हणून नास्ता वगैरे करून दिला,आणि मी निघालो केईएम कडे जायला,त्या अगोदर पुन्हा खात्री केली ,की गरज आहे का,तर समोरची व्यक्ती म्हणाली की,” या मी आपलीच वाट पाहत आहे,”आणि मी निघालो .

साधारण साडेनऊ च्या दरम्यान त्या व्यक्तीला मी भेटलो,त्यांना भेटल्या भेटल्या, त्यांना नाव विचारले आणि त्यांनी सांगितले की ,समाधान इंगळे असे सांगितले,त्यांना बोललो अगोदर की,मला पेशंट बघायचे आहे असे सांगितले,केईएम च्या नवीन बिल्डिंग मध्ये दहाव्या माळ्यावर वार्ड क्र.42 मध्ये त्या मुलाला पाहिले,पाहून मीच दचकलो,हा तर सेम माझ्या मोठ्या मुलासारखा दिसतो आणि मी चौकशी केली त्या मुलाची,आताच तो मुलगा दहावी पास झाला आहे ,जेव्हा त्याचा मी आजार विचारला तर मी अजूनही दचकलो,तर तो आजार होता ब्लड कॅन्सर पहिल्या स्टेज मध्ये होता,खूप वाईट वाटले, त्याच्या आईला मी धीर दिला,आणि सांगितले काळजी करू नका होईल व्यवस्थित ,पहिल्या स्टेज मध्ये आहे लवकर बरा होईल तुमचा मुलगा.आणि आम्ही गेलो रक्त पेढी कडे,तिकडे चौकशी केली असता,त्या मुलाचे रक्त गट होता A+ आणि माझा ग्रुप पण A+ तिकडेच ब्लड बॅंक अधिकाऱ्यांना भेटलो असता ते म्हणाले की A+हा रक्तगट आमच्याकडे नाही,तर मी त्यांना म्हणालो की हे रक्त राखीव ठेऊन त्याच मुलाला द्यावे अशी विनंती केली आणि ती विनंती त्यांनी मेनी केली,साधारण पंधरा मिनिटे रक्त रक्त दिल्यानंतर समाधान कांबळे साहेबाना धीर दिला आणि सांगितले की,तुमचा मुलगा होईल ठीक ,आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव पाहुन मला पण संधान वाटले,की आपल्यामुळे कोणा एकाचा जीव वाचणार आहे,आणि हेच मनाला माझ्या भावून गेलं,

शेवटी बौद्ध धम्मात दानाला खूपच महत्व आहे,सर्वांनी रक्तदान करून सामाजिक भान जपावे,सामाजिक जबाबदारी पार पाडावी ,बाबासाहेब यांनी आपल्याला दिलेले जीवनदान त्याची परत फेड अश्याप्रकारे होत असेल,ह्यापेक्षा आनंद तो काय!

नंतर समाधान इंगळे साहेबांचा निरोप घेऊन मी माझ्या कामासाठी प्रस्थान झालो.

-अनिल जाधव ,चांदीवली ,अंधेरी साकी नाका मुंबई

(प्रस्तुत लेखक सामाजिक कार्यकर्ते असून विविध सामाजिक आणि बौद्ध धमाचे कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये ते सक्रिय असतात )

News Reporter

1 thought on “गाजवाजा न करता ही करू शकता समाजकार्य.अर्थात संवेदना असतील तर …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *