“जातीयवादी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडच्या आंबेडकरवादी मिशन ची लाईट कट केली.”

“काल जातीयवादी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडच्या आंबेडकरवादी मिशन ची लाईट कट केली.”

हजारो अधिकारी ज्या मिशन मधून घडतात, जिथे सर्व बहुजनांची लेकरं ,गरिबांची लेकरं अधिकारी होण्याची जिद्ध ठेवून अहोरात्र अभ्यास करतात.शासनकर्ती होण्यासाठी समाजाच ऋण फेडण्यासाठी आदरणीय दीपक कदम सरांच्या मार्गदर्शन नुसार अभ्यास करून अधिकारी होतात.. त्याच अधिकारी होऊन बाहेर पडणाऱ्या मिशनची एका जातीयवादी अधिकाऱ्यानि कोणतीही पूर्व सूचना न देता डायरेक्ट लाईट बंद केली.. पैसे भरण्यासाठी एक महिन्याची मुदत असताना सुद्धा ,कोणतीही कल्पना न देता त्या अधिकाऱ्याने केवळ आंबेडकरवादी मिशनला टार्गेट केलं.
थोड्या अंतरावरच औद्योगिक वसाहत आहे.. म्हणजे एमआयडीसी आहे.. त्यांची हाजारो रुपयांची बिल थकीत असून,दिवसभर मीटर वर चालवून रात्री कोंडा टाकून वीजचोरी करणाऱ्या धनदांडग्यांची आतापर्यंत वीज कापण्याची हिम्मत ह्या अधिकाऱ्यांनी केली नाही.. मात्र आंबेडकरवादी मिशन प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले आहे.. कोणत्या हि राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा एकही पैसे न घेता केवळ समाजातील सामान्य माणसाच्या पैश्यातून, दीपक कदम ह्यांच्या कष्टातून हि वास्तू साकार झाली आहे.


खेडेपाड्यातून येणाऱ्या गरीब बहुजन समाजातील मुलांना तिथे राहण्यासाठी वसतिगृहाची सोय करण्यात येत आहे. हि जी मुलं अधिकारी बनण्यासाठी ह्या संस्थेत येतात त्यांना बाहेर राहावे लागत आणि स्थानीक त्यांच्याकडून अवाच्या सव्वा भाडे घेत असतात म्हणून वस्तीगृहाचं काम हाती घेतलं त्याच हे बिल.
जातीय अधिकारी काही रक्कमे साठी कसलीही पूर्वसूचना न देता वीज कशी काय बंद करू शकतात ? त्यांची एवढी मजाल का होते ? आपण यावर विचार करावा .. मिशन समाजाने उभे केल आहे. आपल्या घरची लाईट कापली तर घरातील सदस्य अंधारात राहतील.. आंबेडकरवादी मिशन ची लाईट कापली तर समाजातील मूल मुली यांच भविष्य आंधरमय होऊ शकते, सांगण्याचा उद्देश जातीयवाद वाढत आहे.. जातीयवादी लोक एक आहेत.. आपण एक आहोत का? हा गंभीर प्रश्न आहे.. एक व्हा, नेक व्हा, नंतरच जय भीम म्हणा.. आदरणीय दीपक कदम सर यांच्या त्यागातून तयार झालेल्या,समाजाच्या दानातून उभे राहिलेलं हे भारतातील हे पाहिलं अधिकारी घडिवण्याचं केंद्र आहे.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्राण मानून समजातील मूल अधिकारी घडवण्याच एकमेव उद्धेश आंबेडकरवादी मिशनच आहे.आपण आतापर्यंत साथ दिली तशीच आताही द्या. कृतीतुन मदत करून शासनकर्ती जमात होण्यास पाऊल टाकू या. आंबेडकरवादी मिशनला मदत करून समाजाच ऋण फेडूया…
ऐकून थकीत बिल हे १२००००/- रुपये आहे जे कि वसतिगृह बांधकाम करताना वापरलेल्या विजेचं आहे . माझी सर्व दानशूर बांधवाना,मित्रांना नम्र विनंती आहे कि आपण सढळ हस्ते आपल्या कुवतीनुसार लवकरात लवकर हि मदत करावी. कमीत कमी सहाशे रुपये जर २०० व्यक्तींनी पाठवले तरी हे संकट दूर होईल. सर्व जयंती मंडळे आणि सामाजिक भान असलेल्या बांधवाना माझी कळकळीची विनंती.. खाली बँकेचे डिटेल्स देत आहे..
आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र नांदेड

Acc.no.,SBI tuppa Branch,31022654460 IFSC No.SBIN0009383

राजेंद्र (राजा) गायकवाड
शक्य एनर्जी प्रा.ली वायले नगर
खडकपाडा कल्याण
8655155118
शासनकर्ती जमात व्हा…. जास्तीत जास्त अधिकारी निर्माण करा……. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *