नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे.

नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे.

मुंबईतील आजुबाजुचा सात बेटांचा परिसर हा बुध्दभुमीच आहे व त्याच्या पाऊल खुणा मुंबईच्या अंगाखाद्यावर रत्नांकित दागिण्यासारखा उठुन दिसणारा इतिहास…!
बोरिवलीच्या कान्हेरी गुन्फा,अंधेरीच्या महाकाली गुन्फा,नालासोपार्‍यातील ऐतिहासिक स्तृप,घारापुरी आदि लेण्या,आदि तमाम ठिकाणच्या शिलालेखाचे वाचन व ब्रम्ही लिपिचा अभ्यास करुन त्याचे मराठितिल भाषांतर आदिंवर सतत प्रबोधनात्मक जन जागृतीचे काम करित अविरत पणे प्रत्येक लेण्याच्या ठिकाणी जावुन धम्मवंदना घेत लोकांना लेण्यावर जावुन संशोधन करत आहेत .

नागवंशीय लोक हे पुर्वाश्रमिचे बुध्दिस्ट होते व त्याच्या पाऊलखुणा ह्या संपुर्ण महाराष्टात विषेशता मुंबई- कोकण-आदि सह्याद्रिच्या दर्‍याखोर्‍यात लपलेल्या हजारौ लेण्या शोधण्याचे काम करत आहेत सोबत बुध्दिस्ट रिसर्च चे रविंद्र सावंत,अनिल जाधव ,राजेंद्र सावंत आदि सहकारी असतात.
प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे सर्व शीलालेख हे ब्रम्हीतुन लिहिले गेले आहेत त्यांची माहिती भाषांतर करणे पर्यटक व अभ्यासकांना माहिती देणे हे कार्य ते अविरत पणे करत असतात प्रत्येक रविवारी महावंदनेचा कार्यक्रम ते लोकसहभागाने जवळच्या विविध लेण्यात जावुन घेतात. तो सर्व खर्च स्वता उचलणे व कसलेही धम्मदान घेणारे खरे नागवंशिय आहेत . www.ambedkaree.com शी संवाद साधतांना म्हणाले की आपली खरी संस्कृती लोकांना समजली पाहीजे व हा सांस्कृतीक वारसा आपण जपला पाहिजे शासन वा इतर लोक काही करावयाच्या पुर्वी आपण धम्मअनुयायी म्हणुन हे काम केले पाहीजे.

मी हा घेतलेला वसा शेवटपर्यंत साकार करेण बुध्दिस्ट किंग्डम चै स्वप्न साकारणारे नंदकुमार कासारे खरंच नागवंशीय राजे आहेत…,!

-शब्दांकन -शितल प्रमोद जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *