संभाजी भिडेच्या विरोधात घोषणा करणाऱ्या BRSP च्या कार्यकर्त्यांना अटक – शिवडीत तणाव .

संभाजी भिडेची सभा लालबाग ऐवजी शिवडी ला सुरू होण्यापूर्वी दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदारविरोध केला -पोलिसानी कार्यकर्त्याना केली अटक.

मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे याची सभा सभागृहात घेतली. शिवप्रतिष्ठान चा कार्यवाह बोलला परवानगीची गरज नाही….।

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे मुंबईतील शिवडीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. परंतु यावेळी BRSP, भीम आर्मी आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या विरोध केला व त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या सुरक्षेत हा कार्यक्रम पार पडला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

संभाजी भिडे कार्यक्रमातून मार्गस्थ होत असताना भीम आर्मी आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी धारकरी आणि पोलिसांच्या सुरक्षेत भिडे रवाना झाले. कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालणाऱ्या, घोषणाबाजी करणाऱ्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या संपूर्ण घटनेमुळे शिवडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

BRSP चेंबूर तालुका प्रभारी मा.दीपक चौगुले आणि द.म.जिल्हा सचिव मा.प्रदीप अंभोरे यांनाही अटक. संभाजी भिडे ची सभा उधळवण्यास गेलेल्या BRSP चेंबूर चे युवा वॉर्ड अध्यक्ष मा.मयुर आठवले , भीम आर्मीचे अशोक कांबळे, Brsp च्या द.म.मुं.अध्यक्षा वत्सला ताई हिरे,वरळी चे संतोष तळेकर याच्या सोबत इतर कार्यकर्ते व महिलांना अटक करण्यात आली आहे .

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

प्रासंगिक-कल्याणच्या दौरा आणि मराठीतील भाषण.....!

बुध डिसेंबर 19 , 2018
Tweet it Pin it Email मा.पंतप्रधनांचे भाषण आणि आर एस एस वाल्यांचा मीडिया कौतुक करतो मोदी मराठीतुन बोलले ……!. मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधानांनी यावं आणि त्या प्रकल्पाचे भूमिपूजन करावे हे अपेक्षित होते कारण कल्याण -डोंबिवलीत – ठाण्यात ज्या प्रकारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे जाळे आहे त्या प्रकारचे जाळे कुठेही […]

YOU MAY LIKE ..