वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी (ता.15) जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (ता.16) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांकडून व्हीआयपींच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी रुट मार्च काढण्यात आला होता.


यामध्ये सीआरपीएफ, आरसीपी पथकांचा समावेश होता. मात्र, सकाळपासूनच सोशल मीडियावर या रुट मार्चचे फोटो व्हायरल झाल्याने जिल्हात राजकीय चर्चेंना जोर चढला आहे. 

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन 
शहरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद तत्काळ सोशल मीडियावर उमटत आहेत. उलट-सुलट आणि नाहक चर्चेने शहरभर संभ्रम निर्माण होत आहे. या सगळ्या घडामोडींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून सोशल मिडियावरील अफवांसोबत फेक पोस्टवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अकोला पोलिस विभागाच्या सायबर विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरप

रवि मार्च 17 , 2019
Tweet it Pin it Email वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरपणे मतदारसंघ निहाय उमेद्वारांची यादी पुढीलप्रमाणे… १) धनराज वंजारी – वर्धा २) किरण रोडगे – रामटेक ३) एन.के.नान्हे – भंडारा गोंदीया ४) रमेश गजबे – चिमूर ( गडचिरोली ) ५) राजेंद्र महाडोळे – चंद्रपुर ६) […]

YOU MAY LIKE ..