महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना दिलीच पण त्याच बरोबर ते दरवर्षी कोट्यावधी चा निधी ही सरकार ला देत आहेत ……..!

जगातला एकमेव महामानव होय हे खरे आहे ….भारताच्या इतिहासातील एकमेव महापूष की ज्याच्या कर्तृत्वाने देशाची प्रगती तर झालीच त्यात सामाजिक विकास ,आर्थिक विकास आणि देशाचा धोरणात्मक विकास झाला त्यात आधुनिक विचारसरणी याची भर पडलीच नव्या सामाजिक सुधारणा अमलात आल्या भारतीय समाज वर्गीकरण आणि जातीच्या परिघाबाहेर येऊन मुक्तपणे आपला विकास आणि प्रगती करू लागला त्यात देशाचा आर्थिक स्तर उंचावलाच त्याबरोबरच अधिकाधिक प्रमाणात क्रयशक्ती वापरात येऊ लागली ,शिक्षण आणि नव्या संधी निर्माण झाल्या .
महामानवाचे कार्य इथेच थांबत नाही तर त्याही पुढे जाते….!

कित्येकदा एखाद्या समाज सुधारकाचे निर्वाण होते मग हळूहळू त्याचे कार्य त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो आणि मग त्याचे अनुयायी विसरू लागतात ……मग त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या केवळ एक औपचारिकता उरते .

महामानव डॉ बाबासाहेब हे जगातील एकमेव महामानव आहेत की ज्यांच्या सर्वात जास्त उपाद्या ,सर्वात जास्त पुतळे आणि स्मारके,सर्वात जास्त अनुयायी, सर्वात जास्त लोकप्रियता आणि विशेष म्हणजे जो जो डॉ.आंबेडकर वाचतो ,ऐकतो आणि त्यावर विचार करतो तो तो डॉ.आंबेडकरवादी होतो म्हणजेच दररोज हजारो आंबेडकरी अनियायी नवे निर्माण होतात.

नुकताच या महान युगप्रवर्तक महामवांचा 62 वा महापरिनिर्वाण दिन झाला .दर वर्षी प्रमाणे लाखोच्या संख्येने डॉ आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्या चैत्यभूमी कडे त्यांना अभिवादन करण्याकरीता येतात .दरवर्षी त्यात लाखोंची भर पडते त्यातून
भारतीय रेल्वेच्या उत्पादनात कोटयावधी ची भर पडते.पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाची प्रचंड उलाढाल होऊन जगातील सर्वात मोठी पुस्तकविक्री आणि खरेदी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी होते .
त्याच प्रमाणात दरवर्षी नागपूर मुक्कामी होणारा धममचक्र प्रवर्तन दिन याही दिवशी करोडोंची पुस्तक विक्री आणि भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात करोडोंची वाढ होते .
कोणत्याही धार्मिक स्थळा त होणारे विविध जत्रा यात्रा आणि कुंभमेळे यात सरकारी निधी प्रचंड प्रमाणात सारकरमधून दिला जातो त्यात वावगे असे काहीच नाही मात्र त्यातून सरकारला उत्पन्न मिळते असे नाही पण कसला ही निधी वा सोइ सुविधा नसताना केवळ आपल्या लाडक्या जगमान्य महामानवाला अभिवादन करण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनुयायांकडू देशाच्या उत्पन्नात ही करोडोची वाढ होते .

अर्थात यालाच म्हणावे लागते की महामानांवानी जिवंतपाणी देशाला सावरले आता महानिर्णनानंतरही महामानव आपल्या विचाराने आणि कर्तृत्ववाने सावरत आहेत……असे म्हणावे तर वावगे होणार नाही मात्र सरकार कोणाचे ही असो …..जिवतपणी ही देशाच्या जयीय व्यवस्थेने नाकारले आता ही व्यवस्थातच त्यांचे मोठेपण केवळ मान्य करते पण त्यांच्या विचारांची सतत उपेक्षाच होते असे खेदाने म्हणावे लागते .

-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

*

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

One thought on “महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना दिलीच पण त्याच बरोबर ते दरवर्षी कोट्यावधी चा निधी ही सरकार ला देत आहेत ……..!

Comments are closed.

Next Post

स्वच्छता अभियान राबवून केले महामानांवाना अभिवादन...!

सोम डिसेंबर 10 , 2018
Tweet it Pin it Email विविध संस्था आणि संघटनांनी राबविले चैत्यभूमी परिसर स्वच्छता अभियान…..! दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाखोचा जनसागर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात जमा होतो त्याच्या व्यवस्थापनाची चोख कामगिरी मुंबई महानगर पालिका करत असते मात्र आपल्या बांधवांच्या येण्याने जो ताण महानगर पालिकेवर पडतो त्याला सहकार्य म्हणून मुंबई आणि […]

YOU MAY LIKE ..