महामानव डाॅ.आंबेडकर ,क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्या आणि समाज व्यवस्था…!

महामानव डाॅ.आंबेडकर ,क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्या आणि समाज व्यवस्था…!

काल राजस्थान न्यायालयात क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांवर ट्विट जे केले ते अत्यंत खालच्या पध्दतीचे असलेले विधान आहे. यावर राजस्थान न्यायलयात खटला दाखल करण्यात येवुन तो भलताच वादात सापडलाय.

तुर्तास सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यान त्यावर बोलणे न्याय्य नाही. मात्र आजही भारत महामानवांचा द्वेषकरतो, जातियतेचे समर्थन करतो पर्यायाने गुलामगिरीचे समर्थन करणारे लोक या देशाला अराजकतेकडे नेत आहे हे येथे मत मांडावेसे वाटते तसैच या जातियवादी माणसिकतेचा आम्ही निषेध जाहिरपणे व्यक्त करत आहोत

खरतर या देशातली समाज व्यवस्था हजारो वर्षांपासुन जातीयतेच्या चिखलातुन बाहेर येण्याच्या विचार ही करीत नाही. पंड्यासारखे चिमुटभर हाय प्रोफाईल लोकही त्यातुन सुटत नाहीत व स्वताची वैचारिक माणसिकता काय याचे प्रदर्शन करतात हे चित्र खरच वर्ण व्यवस्था अन जातीयता किती समाज मनावर खोलवर रुजली आहे व तीचा परिणाम आजच्या तरुण मनावर किती प्रकारे भयानक पणे बिंबला आहे याचे हे ह्य प्रोफाईल उदाहरण.

खरं तर महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोट्यावधी लोकांना समतेचा अन हक्काचा रक्तहीन क्रांतीचा मार्ग दिला व त्यांचे घटनात्मक संरक्षण दिले ते किती योग्य अन मानवता वादी होते ते या घटनेने आज स्पष्ट झाले. पंड्या सारखे कितीतरी लोक आज महामानवांचा द्वेष करतात ज्या महामानवांनी आपला एकही क्षण ऐशारामात न घालवता समाजासाठी पणाला लावला व रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत ते समाजासाठी,देशासाठी लढत राहिले त्या महामानवांसमोर नतमस्तक होण्याऐवजी त्यांचा द्वेष करुन जाहिरपणे सोशल मिडियावर पोष्ट करण्या पर्यंत बोलावे हेच धोकादायक आहे. याचाच अर्थ इथला शोषित समाज हा अजुनही गुलामीत राहावा, त्याला त्याच्या हक्काचा अधिकार मिळविण्याचा सनदशीर मार्गच बंद करण्याचे षडयंत्र किती खोलवर जावुन काम करत आहे याचा अंदाज येतो.

इथला शोषित वर्ग हा गुलाम आहे.हे जगाला दाखवण्याचे महान कार्य ह्या हाय प्रोफाइल व्यक्तीमत्वाद्वारे दिखवण्यात येतेय आणि संपुर्ण भारत देश शांत आहे .एक कालचा पोर क्रिकेट मध्ये खेळतांना आपल्या आवडिच्या क्षेत्रात नावारुपाला येवुन राष्तपुरुषांचा अपमान करत असतांना सारा देश चुडिचुप शांत आहे .ज्या देशात त्यांच्या आदर्शांचा अपमान होतोय. ज्या देशाचा तरुण भरकटवला जातोय त्या देशाचा भविष्यकाळ धोक्यात आहे.
तरुणांची माणसिकता जर जातियवादी असेल तर या देशातील जातीवाद संपणारच नाही.
एक नामांकित मिश्रा नावाचा पत्रकार आरक्षण संपावे म्हणुन आंदोलन करतो व एक क्रिकेटर आरक्षणाद्वारे शोषितांना न्याय देणार्‍या महामानवांची टिंगल करणारी व्यक्तव्य करतो हे धोकादायक व भयानक आहे हे लोक जातिवादाचे समर्थक असुन घटनेच्या समता ,बंधुता अन न्याय याच्या विरोधात आहेत.

आरक्षण संपवावयाचे असेल तर प्रथम जातियता संपवावी लागेल या देशात जाती अंत झाला तरच आरक्षणाचा ही अंत होईल पण समाजव्यवस्थेचाढाचा न समजणारे हे हाय प्रोफाइल मनुवादी समजतील तो दिवस या देशाचा सुवर्ण दिवस असेल.

-प्रमोद रामचंद्र जाधव

www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

शिक्षणाची संधी आणि रोजगाराच काय???

शुक्र मार्च 23 , 2018
Tweet it Pin it Email शिक्षणाची संधी आणि रोजगाराच काय??? केंद्रात आणि राज्यात असलेले बीजेपी सरकार घोषणाबाजी,जाहिरात बाजी यावर भर देवुंन  सतत मतदादारांना भुलविणार्‍या सरकार विरोधात नुकताच शेतकर्‍यांनी  लाॅग मार्च केला त्यानंतर आता शिक्षणाच्या हक्कासंदर्भात डेमोक्रेडीट युथ फेडरेशन व स्टुटंट फेड्रेशन आॅफ इंडिया यांच्यावतनं आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. Pin […]

YOU MAY LIKE ..