मराठीतले पहिले विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व अस्मितादर्श चे आंबेडकरी साहित्यिक डाॅ.गंगाधर पानतवणे

डाॅ गंगाधर पानतावणे

जन्म : २८ जून, १९३७
नागपुर ,विदर्भ महाराष्ट

डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली पहिले मराठी साहित्यिक.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत होते.

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटीत व्हा ,संघर्ष करा हा मुलमंत्र घेत कोठ्यावधी अनुयायी आपल्या पोटापाण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष देवु लागले पर्यांयाने ज्या क्षितीजावर कधी ज्ञानाचा सुर्य उगवत नव्हता त्याच क्षितीजावर हजारो लखलखणारे व अज्ञानरुपी अंधाराचा नाश करणारे लाखो तेजस्वी तारे या भारताताच्या क्षितीजावर स्वयं प्रकाशित होत आपल्या हिमतीवर लखलखु लागले त्यातील साहित्य क्षितीजावर जे काहि साहित्यिक आपल्या प्रखर तेजाने तळपत होते त्यातील अस्मितादर्श चे डाॅ. गंगाधर पानतावणे यांचे स्थान नक्कीच अग्रण्य आहे .विदर्भातील नागपुर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला यात प्रत्यक्ष महामानवांचा पदस्पर्श लाभलेले ठिकाण अन याच ठिकाणी महामानवांनी दिलेला विश्वोधारक तथागताचा प्रेरणादायी धम्म …!
नागपुर करांनी संपत्ती कमी पण बाबासाहेंबा मुल मंत्र जीवापाड जपला त्यातील डाॅ. गंगाधार पानतावणे एक आहेत .ज्ञानाच्या शिखरावर बसुन केवळ समाजमनाशी जुळवुन न घेता विद्रोहाची आग सतत तेवत ठेवत ते जगले .
आंबेडकरी ,बौध्द म्हणा अथवा दलित म्हणा ह्या साहित्याच्या क्षितीजावर निर्माण होणार्‍या पिढ्या घडविण्याचे कार्य डाॅ.पानतावणे अन कित्येक महान लेखकांनी केलेय हे कबुल करावेच लागेल .त्यांनी लिहिलेले
`धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.

नागपुरच्या डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण व नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण घेवुन
1956 साली मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळववुन त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवणारे एक विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक आणि संपादक असलेले डाॅ.गंगाधर विठोबाजी पानतावणे विविध अंगी साहित्यिक होते.

सुरूवातीला प्रतिष्ठान` नियतकालिकातून सुरुवातीला लेखन करुन त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे समाजव्यवस्थेतील सळसळता विद्रोही हुंकार आहे.

अस्तितादर्श या नियतकालिकाच्या संपादनाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ.

चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिक म्हणून अस्मितादर्श कडे पाहिले जाते.

दलित साहित्य व आंबेडकरी चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक होते.

*डॉ. गंगाधर पानतावणे यांचे प्रकाशित साहित्य पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रतिमा प्रकाशन)
* दलित वैचारिक वाङ्मय (समीक्षा)
*अर्थ आणि अन्वयार्थ (समीक्षा)
*चैत्य लेणी (व्यक्तिचित्रे, प्रतिमा प्रकाशन)
*स्मृतिशेष (व्यक्तिचित्रे, सुविद्या प्रकाशन)
*दुसऱ्या पिढीचे मनोगत (संपादन)
*संपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख अस्मितादर्शन (त्रैमासिक)
अन असे बरेच साहित्य ,वृत्तपत्रे,मासिके,नियतकालिके आदि ठिकाणी त्यांचे बहुयामी लेखन प्रकाशित झालेले आहे.

-प्रराजा

Team :

www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

औरंगाबादची  ओळख —नागसेन फेस्टीवल उद्यापासून

गुरू मार्च 29 , 2018
Tweet it Pin it Email औरंगागाबादची  ओळख —नागसेन  फेस्टीवल उद्यापासून सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. […]

YOU MAY LIKE ..